मुंबई : एक उत्तम राजकारणी अशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र, राज ठाकरे चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणार आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा करत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. दोन ते तीन भागात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा काढणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगीतले.
हर हर महादेव चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा करत असल्याचे जाहीर केले.
गांधी चित्रपट मी ३० ते ३२ वेळा पाहिला, पण मला हा चित्रपट समजला होता. कॉलेजच्या काळात माझ्या पहिल्यांदा माझ्या विचार मनात आला की शिवाजी महाराजांवर असा भव्य चित्रपट व्हायला हवा.
माझ्या आजोबांचं एक पुस्तक होतं ते मी वाचलं. ते सर्व ऐकलं, पाहिलं आणि वाचलं. त्यानंतर मला असं लक्षात आलं की शिवरायांवर फक्त एकच चित्रपट होऊच शकत नाही.
शाहीस्तखान, अफजलखान, आग्र्यावरुन सुटका या चार पाच प्रसंग सोडून अजूनही खूप इतिहास आहे. यामुळे दोन ते तीन पार्टमध्ये छत्रपती शिवरायांवर चित्रपट आणायचा माझा विचार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले.