गौतमी पाटीलचा जबरा फॅन, या गोष्टीमुळे हॉटेल मालक चर्चेत

| Updated on: Jan 02, 2023 | 9:38 PM

एका हॉटेलच्या मालकानं गौतमी पाटील हिच्या नावानं थाली सुरू केली. त्यामुळं हॉटेल मालक चर्चेत आलेत.

गौतमी पाटीलचा जबरा फॅन, या गोष्टीमुळे हॉटेल मालक चर्चेत
गौतमी पाटील
Follow us on

सोलापूर : नृत्यांगणा गौतमी पाटील या ना त्या कारणानं चर्चेत असते. अश्लील नृत्य करत असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात येतो. परंतु, तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी होतना दिसत नाही. आता तर एका वेगळ्याचं कारणानं गौतमी पाटील चर्चेत आली ते म्हणजे तिच्या नावानं सुरू करण्यात आलेली थाली. गौतमी पाटीलच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. एका हॉटेलच्या मालकानं गौतमी पाटील हिच्या नावानं थाली सुरू केली. त्यामुळं हॉटेल मालक चर्चेत आलेत.

नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे राज्यभरात लाखो चाहते आहेत.तिच्या कार्यक्रमांना अलोट गर्दी होताना आपल्याला पहायला मिळते. माढा तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील टेभुर्णी शहरातील गौतमी पाटील हिच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. तिच्याच नावाने हॉटेल मालकाने गौतमी स्पेशल थाळी सुरु केली आहे.

या स्पेशल थालीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल दाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाब जामचा समावेश आहे. अशी स्पेशल गौतमी पाटील व्हेज थाली बनवण्यात आलीय. २४० रुपये इतकी या थालीची किंमत ठेवण्यात आलीय. गौतमी पाटील या लोककलाकाराच्या नावाने सुरु झालेली बहुधा ही पहिली थाळी असावी. त्यामुळं या थालीची चर्चा होत आहे. हॉटेल मालकची चर्चेत आले आहेत.

गौतमी पाटीलच्या नावे ही थाली सुरू केल्याचं हॉटेल मालक महेश गोरे यांनी सांगितलं. तर खवय्ये नागेश पाटील व नागनाथ को॓ळी यांनी ही थाली खाऊन समाधान व्यक्त केलं. यावेळी गौतमी पाटीलनं तिथं उपस्थितांचं मनोरंजन केलं.