बॉलिवूड अभिनेत्री असो किंवा टेलिव्हिजनमधील एखादी अभिनेत्री असेल प्रत्येकीला कधीनाकधी विचित्र अनुभव आला आहेतच. अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्रींनी त्यांचे अनुभव सांगितले आहे. एका अभिनेत्रीबाबत असाच एक भयानक किस्सा घडला आहे. जो तिने शेअर केला आहे.
अभिनेत्रीसोबत घडला होता धक्कादायक प्रकार
अभिनेत्रीने एका प्रसिद्ध मालिकेत काम केलं आहे. एका टॉप टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला भयानक किस्सा सांगितला आहे. ही अभिनेत्री म्हणजे रतन राजपूत. ‘अगले जनम मोहे बिटिया ना कीजो’ हा टीव्हीवरचा एक टॉप शोमध्ये ती दिसली होती.
या मालिकेतून रतन राजपूतने आपल्या अभिनयाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. रतन राजपूतला ही सीरियल संपल्यानंतर कोणतं दुसरं काम मिळालं नाही. त्यामुळे तिने आपल्या गावीच राहण्याचा निर्णय घेतला.
त्या व्यक्तीने जबरदस्तीने खेचत जंगलात नेलं
दरम्यान रतन गावी राहायला गेली तेव्हा तिने सुरुवातीला अनेक व्हिडीओ शेअर केलेले आहे. तिथली जीवनपद्धती तिने दाखवली होती. रतनसोबत हा किस्सा गावीच घडला असल्याचे तिने सांगितले. तिने हा किस्सा सांगताना सांगितले, एका व्यक्तीने तिला जबरदस्तीने खेचत जंगलात नेलं आणि तिचं तोंड दाबलं. ती त्यावेळी खूप किंचाळत होती. मंडी हाऊसमध्ये एक्टिंगच्या क्लासला जात असताना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडल्याचं तिने सांगितले.
एक जण तिचा पाठलाग करत होता आणि नंतर त्याने तिला मागून येऊन पकडलं. पुढे तिने हा किस्सा सागंत म्हणाली ” त्याने हात पकडला आणि मला जंगलात घेऊन जात होता. तुला फोन देतो असं सांगत होता. मी याच्यापासून वाचेन की नाही असा प्रश्न मला पडला. मी किंचाळत होते आणि लोक पाहत होते पण कोणी मदतीला आले नाही” असं म्हणत आजूबाजुची लोकं फक्त पाहत राहिली होती याबद्दल तिने राग व्यक्त केला.
अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर असून आपल्या गावी राहतेय
पुढे ती म्हणाली,”शेवटी एका विद्यार्थ्याने त्यावेळी माझी मदत केली आणि मला सुखरुप घरी पोहोचवलं. माझ्यासोबत असं घडल्याने मी घाबरले होते” असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रतन राजपूतने महाभारतमध्ये देखील काम केलं आहे. आता ती इंडस्ट्रीपासून दूर असून आपल्या गावी राहत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री एक्टिव्ह असून ती नेहमीच आपले फोटो आणि व्हडीओ शेअर करत असते.अशाच एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने हा किस्साही शेअर करत कधी काहीही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला सावध राहणं किती गरजेच आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.