मुंबई : बॉलिवूड एक्टर आमीर खानची (Amir Khan) मुलगी इरा खान हीची ओळख एक्टिव्ह स्टार किड्स अशी सोशल मीडियावर आहे. सिनेमांपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मग ते बॉयफ्रेंडसोबतचे (Boy Friend) फोटो असतो वा स्वताच्या अपडेबाबतच्या पोस्टच असोत. इरा खानची (Ira Khan) चर्चा आत्ता होण्याचे कारण म्हणजे, नुकताच तिचा 25 वा वाढदिवस पार पडला. तिचे वडील आमीर खान यांनी तिचा वाढदिवस घरी येऊन साजरा केला. सोशल मीडियावर नेहमीच इराचे फोटोही खूप व्हायरल होतात. यावेळी वाढदिवसातला एका फोटो व्हायरल होतोय, त्यात ती केक कापताना दिसते आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत इरा खान केक कापताना दिसते आहे. फोटोत वडील आमीर खान, आई रीना दत्त आणि भाऊ आझाद हेही मागे उभे असलेले दिसतायेत. आमीर, इरा आणि आझाद हे नुकतेच पोहून बाहेर आल्यासारखे फोटोत दिसतायेत. तर आई रीना मात्र कोरडी असल्याचे पाहायला मिळतेय. इराने पोहण्यासाठी घालत असलेल्या स्वीम वेअरमध्येच केक कापला आहे. तर आमीर खान आणि आझाद हे उघडेच आहेत.
सोशल मीडियावर हा फोटो आल्यानंतर काही मिनिटांतच तो व्हायरल झाला. असे खूप कमी क्षण आहेत ज्यात आमीर खान त्याची पहिली बायको रीना दत्ता हिच्यासोबत एकाच फ्रेममध्ये आहेत. अनेक वर्षांनी यात आमीर खान याचे पूर् कुटुंब एकाच फोटोत पाहायला मिळाले आहे. आमीरने खूप आधी रीना दत्ता यांना घटस्फोट दिला आहे. मात्र या फोटोत आमीरची दुसरी बायको कीरण राव ही मिसिंग आहे.
या फोटोवरुन इराला खानला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. स्वीम ड्रेसमध्ये केक कापला म्हणून तिला चाहत्यांच्या नाराजीचाही सामना करावा लागला आहे. तर काही जणांनी फोटोत बॉयफ्रेंड का नाही, असाही प्रश्न तिला सोशल मीडियावर विचारण्यात आला आहे.