बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत आहे. कारण तर सगळ्यांनाच माहीत आहे. कालच आमिरने ( 14 मार्च) त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला, मात्र त्यापूर्वीच त्याने त्याची गर्लफ्रेंड गौरसोबतच नातं जाहीर केलं. आमिरच्या या घोषणेपासूनच सोशल मीडियावर गौरी स्प्रॅटची सगळीकडे चर्चा आहे. तिचे फोटोही बरेच व्हायरल झालेत. तिचं घर, मुलं, नोकरी सगळं काही उघड झालंय. परंतु जे काही शिल्लक होते ते Reddit युजर्सनी शोधून काढलं आहे. माजी क्रिकेटर इरफान पठाणच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ती आमिर खानसोबत दिसली आणि तो व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला.
आमिर-गौरी दिसले एकत्र
आमिर खानने गेल्या महिन्यात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या लग्नाच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. इरफान पठाणने पाच आठवड्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. यादरम्यान तो पत्नी सफा बेगसोबत केक कापताना दिसत आहे. आमिर खानही त्याच्याजवळ बसलेला दिसला. आता हाच व्हिडिओ एका Reddit युजरने देखील शेअर केला आहे. आमिर आणि गौरी इरफान पठाणच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, असे त्याच्या कॅप्शनमध्येही लिहीलं होतं. याच व्हिडिओमध्ये आणखी एक फोटो आहे – ज्यामध्ये गौरी आमिरसोबत कोपऱ्यात दिसत आहे. या पार्टीला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि झहीर खान, आशुतोष गोवारीकर, राज ठाकरे हे देखील उपस्थित होते.
आमिरची माजी पत्नीही होती उपस्थित
विशेष म्हणजे या पार्टीसाठी आमिरची माजी पत्नी किरण राव ही उपस्थित होती. तर तेव्हाच आमिर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता. या पार्टीमध्ये गौरीने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. इरफान व त्याची पत्नी केक कापताना आमिर त्याच्या शेजारी बसला होता, तर त्याच्या मागे एका कोपऱ्यात गौरी उभी होती. Reddit युजरने हा व्हिडीओ री-शेअर करत ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर अनेक लोकांनी इरफान पठाणच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. सर्व कौटुंबिक फंक्शन्समध्ये ती हजर असल्याचे या व्हिडिओवरून स्पष्ट होते. एवढंच नव्हे तर आमिरच्या माजी पत्नीशी तिची मैत्री असल्याचंही समोर आलं आहे.
आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1986 मध्ये रीना दत्ता हिच्यासोबत लग्न केलं. रीना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहेत. आमिर आणि रीना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिर याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण हिला देखील एक मुलगा आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी विभक्त असल्याची घोषणा केली.
तर आता आमिरनमे गौरीसोबत दीड वर्षांपासून रिलेशनमध्ये असल्याचं कबूल केलं. गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस आमिर खान फिल्म्समध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. गौरीची आई तामिलियन असून वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरीला 6 वर्षांचा मुलगा असल्याचं समजतं.