Ira Khan And Nupur Shikhare Christian Wedding : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं रजिस्टर मॅरेज 3 जानेवारीला पार पडलं. त्यानंतर उदयपूरमध्ये शानदार विवावह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबीय आणि मोजकी मित्र-मंडळी यांच्या उपस्थितीत काल (10 जानेवारी) रोजी आयरा आणि नुपुर पुन्हा लग्नबंधनात अडकले. ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्न केले. त्यांच्या विवाह सोहळ्याचे व्हिडीओ आणइ फोटो सोशल मीडियावर आले असून बघता बघता ते वेगाने व्हायरल झाले. त्यामध्ये आयराने पांढरा शुभ्र गाऊन घातला होती. मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने आयराने तिचा लूक पूर्ण केला.
हातात हात घालून पोहोचलं जोडपं
दरम्यान, आयराचा वर, म्हणजेच नुपूर शिखरे हा बेज रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. आयरा आणि नुपूर दोघंही एकमेकांचा हात पकडून, लग्नासाठी येत असतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. उपस्थित वऱ्हाड्यांनी दोघांवरही फुलांचा वर्षाव केला. लाडक्या लेकीला वधूच्या वेषात पाहून आमिर खानही भावूक झाला.
व्हाईट गाऊनमध्ये सुंदर दिसत होती आयरा
आयरा आणि नुपूरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आणि लग्नासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आयरा आणि नुपूर एकमेकांसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. व्हाईट गाऊनमध्ये आयरा अतिशय सुंदर दिसत होती.
संगीत सोहळ्यात जोडप्याने केली धमाल
यापूर्वी या जोडप्याच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये आयराने हेवी वर्क असलेला लेहेंगा घातला होता. आयरा आणि नुपूरसोबतच आमिर खान आणि कुटुंबातील इतर लोकांनीही संगीतमध्ये धमाल केली. ते फोटोही इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाले.
दरम्यान ज्वाला गुट्टाही तिचा पती विष्णू विशालसोबत आयरा आणि नुपूरच्या लग्नात पोहोचली होती. त्याने या जोडप्याच्या संगीत सोहळ्यातील काही फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले.