बनियान-शॉर्ट्समध्ये आमिरच्या जावयाने केलं लग्न, आयरा-नुपूरच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 04, 2024 | 8:55 AM

आमिर खानची लाडकी आयरा खान विवाहबंधनात अडकली. वधू आयरा हिला घेण्यासाठी नूपुर शिखरे अतिशय अनोख्या स्टाईलमध्ये पोहोचला. खरंतर, आमिरचा जावई घोड्यावर बसून नव्हे तर बनियान आणि शॉर्ट्स घालून चालत कार्यक्रमस्थळी पोहोचला आणि लग्न केले. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बनियान-शॉर्ट्समध्ये आमिरच्या जावयाने केलं लग्न, आयरा-नुपूरच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई | 4 जानेवारी 2024 : आमिर खानची लाडकी लेक आयरा आणि नुपूर शिखरे यांचा बहुचर्चित विवाहसोहळा काल (3 जानेवारी) पार पडला. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची धामधूम सुरू होती, सोशल मीडियावरही विवाहसोहळ्याचीच चर्चा होती. अखेर बुधवारी, आयरा आणि नुपूर दोघांचे लग्न नोंदणी पद्धतीने (रजिस्टर मॅरेज) पार पडले. या लग्नाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये आमिरचा जावाई, नुपूर अनोख्या अंदाजात दिसत आहे. खरंतर या लग्नासाठी नुपूर शिखरे घोड्यावर बसून नव्हे तर बनियान आणि शॉर्ट्स घालूनच वरात घेऊन पोहोचला.

पहिल्यांदा तर त्याने त्याच अवातारात ढोलवर बसून धमाकेदार डान्स केला, त्यानंतर तो त्याच्या भावी वधूला नेण्यासाठी व्हेन्यूवर पोहोटला. भावी वराला अशा अंदाजात फारसं कोणी पाहिलं नसेल. नुपूरच्या या ड्रेसचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्नसमारंभासाठी आयरा आणि नुपूरचे जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. लग्नात आयरा खानने धोती चोली परिधान केली होती, पण नुपूर मात्र शॉर्ट्सवरच होता. लाडक्या लेकीच्या लग्नासाठी आमिरने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता घाला होता, तर आई रीना दत्ता हिने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला. आमिरची दुसरी (माजी पत्नी) किरण राव ही सोनेरी रंगाच्या साडीत उठून दिसत होती.

नुपूरचा अनोखा अंदाज झाला व्हायरल

नुपूरच्या या ड्रेसची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अनेक जण त्या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या लग्नाचे केवळ एक न्वहे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये नुपूर शिखेर व्हेन्यूवर आयरा खानसोबत बसलेला दिसत आहे. दोघांनीही रजिस्टर मॅरेज केले. आयरा छान सजून-धजून आली होती, तप नुपूर मात्र काळ्या रंगाचा बनियान शॉर्ट्सवरच लग्नासाठी आला. आमिर खानने दोघांनाही मनापासून आशिर्वाद दिला. खरंतर लग्नासाठी व्हेन्यूवर पोहोचण्यापूर्वी नुपूरने ढोलाच्या तालावर धमाकेदार डान्सही केला.

 

या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या. व्हिडिओवर कमेंट करताना यूजर्सनी लिहिले की, ‘हा जगातील पहिला वर आहे, जो स्वतःच्या लग्नात अशा स्टाईलमध्ये पोहोचला आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे लग्न कमी आणि स्पोर्ट्स डे जास्त वाटतोय.’ पण आमिर खानने आपल्या घामाघूम जावयाला मिठी मारून त्याचे भव्य स्वागत केले.

 

दरम्यान आयरा व नुपूर यांच्या लग्नासाठी मुकेश व नीता अंबानीही पोहोचले. आमिर खानने त्यांचं हसतमुखाने स्वागतत केलं. त्यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.