मुंबई | 16 जानेवारी 2024 : आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते. अलीकडेच आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांच लग्न झालं. 3 जानेवारीला त्यांनी मुंबईत रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये धूमधडाक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. तेथे मेहंदी, संगीत, हळद असे समारंभही झाले. त्यानंतर आयरा व नुपूर यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. रजिस्टर मॅरेज दरम्यान नुपूर शिखरेच्या लूकमुळे त्याला बरंच ट्रोलही करण्यात आलं.
दरम्यान आता आयरा-नुपूरच्या उदयपूरमधील विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नुपूर आयराचा गुलाम असे वर्णन केले जात आहे. खरंतर हा आयरा-नुपूरच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ आहे. वर आणि वधू दोन्हीकडच्या लोकांनी या संगीतमध्ये आवर्जून भाग घेत धमाल केली.
नुपूर बनला आयराचा गुलाम
त्याच दरम्यान आयराच्या काही नातेवाईकांनी हे गाणं सादर केलं. ज्यामध्ये मजेमजेत त्यांनी नुपूरला आयराचा गुलाम म्हटलं. हा रंजक व्हिडीओ बराच व्हायरल होत असून त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. संगीत सोहळ्यातील या व्हिडीओवर नेटकरीही कमेंट करताना दिसत आहेत. संगीत सोहळ्यात सर्वांनीच धमाल केली, महिलांनी भरपूर गाणी वाजवली आणि नृत्यही केले. व्हिडिओमध्ये महिला एक मजेदार गाणे गाताना आणि नुपूरला आयराचा गुलाम म्हणताना दिसत आहेत.
नुपूरला धुवायला लावणार आयराचे कपडे
आयरा आणि नुपूरचे उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाले आणि त्यांचा संगीत कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात आला होता. येथे काही महिला एक मजेदार गाणे गाताना दिसल्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या महिला नुपूरला आयराचा गुलाम म्हणतात आणि गाते की “नूपूरला धोबी बनवले जाईल आणि आयराचे कपडे धुवायला लागतील.” हे गाणे ऐकून तिथे उपस्थित लोक जोरजोरात हसायला लागतात.
आयरा झाली इमोशनल
या व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खान देखील संगीत फंक्शनमध्ये खूप खुश दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमिर खानने त्याची माजी पत्नी किरण राव हिच्यासोबत फूलों का तारों का सबका कहना है हे गाणेही म्हटले. यावेळी वधू आयरा खान खूप भावूक झाली आणि यावेळी सर्व पाहुणे खूप एन्जॉय करताना दिसले.