अभिनयाला ‘राम-राम’ केला; अभिनेत्री बनली या फेमस ब्युटी प्रोडक्टच्या 1300 कोटींच्या कंपनीची मालकीण

| Updated on: Jan 08, 2025 | 5:32 PM

अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने अभिनय कायमचा सोडत एका ब्युटी प्रोडक्टच्या ब्रँडची सुरुवात केली. ही अभनेत्री आता चक्क

अभिनयाला राम-राम केला; अभिनेत्री बनली या फेमस ब्युटी प्रोडक्टच्या 1300 कोटींच्या कंपनीची मालकीण
Follow us on

बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयासोबतच स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहेत. कोणी कपड्यांचा, तर कोणी ब्युटी प्रोडक्टचा ब्रॅंड सुरु केला आहे. काहींनी अभिनयासोबत त्या ब्रॅंडचे कामही सांभाळतात,तर काही जणींनी अभिनय सोडून आपला पूर्ण वेळ हा व्यवसायाला दिला आहे.

अभिनय सोडला अन् बनली 1300 कोटींच्या कंपनीची मालकीण

अशीच एक अभिनेत्री आहे जी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने अभिनय क्षेत्राला राम-राम करत बिझनेसवर लक्ष दिलं आहे. जी एकेकाळी छोटा पडदा गाजवत होती ती अभिनेत्री आज 1300 कोटींच्या कंपनीची मालकीण बनली आहे. ही अभिनेत्री म्हणजे आशका गरोडिया.

आशकाने खलनायिका बनून प्रत्येक घरात आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि तिने टीव्ही इंडस्ट्रीला बाय-बाय करत स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे आणि त्यातून कोट्यवधींची उलाढाल करत आहे. आशका अचानक छोट्या पडद्यावरुन गायब झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्र सोडून व्यवसाय क्षेत्रात भरपूर यश मिळवलं आहे.

टीव्ही इंडस्ट्री कायमची सोडली

आशकाने 2002 मध्ये अभिनय क्षेत्रातील करियरला सुरुवात केली आणि त्यानंतर 2019 मध्ये टीव्ही इंडस्ट्री कायमची सोडली. त्यानंतर तिने व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. ती सध्या 1300 कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे.

आशकाने ब्युटी व्यवसायात पाऊल ठेवलं. आशकाने तिच्या दोन मित्रांसोबत मिळून 2018 मध्ये ‘रेने कॉस्मेटिक्स’ कंपनीची सुरुवात केली. ही कंपनी सध्या कोट्यवधींची उलाढाल करते. ‘रेने कॉस्मेटिक्स’ सध्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

रेने कंपनीची मालकीण

दरम्यान रेने कंपनीचे प्रोडक्ट्स लोकांच्या पसंतीस उतरले आणि या कंपनीची उलाढाल कोट्यवधींपर्यंत पोहोचली. एका रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत ‘रेने’ या कॉस्मेटिक्स ब्रँडची किंमत 1300 रुपये झाली आहे. आज आशका गरोडिया एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिने शून्यातून सुरु केलेला हा व्यवसायत खूप यशस्वी झाला आहे.

आशका गरोडियाने 2002 मध्ये ‘अचानक 37 साल बाद’ या टीव्ही मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. तिने बहुतेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. यानंतर ती ‘कुसुम’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘विरुद्ध’, ‘सात फेरे’, ‘लागी तुझसे लगन’ आणि ‘भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली.