Abhishek Bachchan | अभिषेकला राग आला तर ऐश्वर्या राय कसं करते त्याला शांत ? अभिनेत्याने पत्नीबद्दल सांगितली ही खास गोष्ट…

| Updated on: Aug 19, 2023 | 1:08 PM

Abhishek Bachchan With Aishwarya Rai : अभिषेक बच्चन नुकताच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलला होता. राग आल्यावर पत्नी, ऐश्वर्या राय बच्चन त्याला कसं शांत करते, याचा खुलासाही त्याने केला.

Abhishek Bachchan | अभिषेकला राग आला तर ऐश्वर्या राय कसं करते त्याला शांत ? अभिनेत्याने पत्नीबद्दल सांगितली ही खास गोष्ट...
Follow us on

मुंबई | 19ऑगस्ट 2023 : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने धूम, धूम 2, गुरु, बंटी और बबली, युवा, रावण, कभी अलविदा ना कहना, रन, पा, दसवीं यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. घूमर (Ghoomar) हा त्याचा नवा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यासाठी त्याचे बरेच कौतुकही होत आहे. अभिषेक सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्या दरम्यान त्याने पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) बद्दल एक मोठा खुलासा केला. आपल्याला राग आल्यावर तो कंट्रोल करण्यासाठी ऐश्वर्या काय करते, हे त्याने नमूद केले.

ऐश्वर्या कसा शांत करते अभिषेकचा राग

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिषेकने सांगितले की, त्याची पत्नी, ऐश्वर्या त्याला आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टींची आठवण करून देते. ‘कधीकधी असं होतं की तुम्ही घरी परत येता तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे इरिटेट झालेले असता. कधी ट्रॅफिक तर कधी इतर काही कारण असू शकतं. ( मी जर अशा मूडमध्ये घरी आलो तर) त्यानंतरही ऐश्वर्या मला समजावते. का इतका चिडचिड करत आहेस ? असं विचारत ती मला शांत होण्याचा सल्ला देते. तू आता घरी आला आहेस आणि इथे तुझं एका शांत आणि सुखी कुटुंब आहे, याची तुला जाणीव आहे ना ? याची ती मला आठवण करून देते, ‘ असं अभिषेकने नमूद केलं.

कोव्हिड दरम्यान ऐश्वर्याने अभिषेकला दिला होता मोलाचा सल्ला

याचसंदर्भात पुढे बोलताना अभिषेकने कोव्हिडच्या काळातील एक आठवण सांगितली. तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती, ज्यामुळे मी खूप प्रभावित झालो होतो. त्यावेळी मी, माझे बाबा, माझी पत्नी आणि माझी मुलगी, असे आम्ही चौघेही (कोव्हिडमुळे) एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये होतो. बरं झाल्यानंतर आम्ही एकेक जण हळूहळू घरी येत होतो, मी सर्वाच शेवटी घरी आलो. मी सुमारे महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी तिथून घरी परत आलो तेव्हा ती (ऐश्वर्या) मला म्हणाली की, आपण सगळे इथे आज एकत्र आलो आहोत, आपण किती भाग्यवान आहोत ना ! अशी अनेक कुटुंब आहेत, जी कोविडच्या तडाख्यात उध्वस्त झाली होती. अशावेळी आपण किती भाग्यवान आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असं ती म्हणाली, असे अभिषेकने नमूद केले.