लेक आराध्याच्या पार्टीत अभिषेकने असं काही केलं की,चाहते म्हणाले “हे फक्त एक बापच करू शकतो”

| Updated on: Jan 10, 2025 | 6:58 PM

अभिनेता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक आपल्या लेकीच्या म्हणजे आराध्याच्या पार्टीत लहान मुलाप्रमाणे डान्स करताना दिसत आहे.

लेक आराध्याच्या पार्टीत अभिषेकने असं काही केलं की,चाहते म्हणाले हे फक्त एक बापच करू शकतो
Follow us on

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दलच्या चर्चा तर होतच असतात पण आजकाल अभिषेक आणि ऐश्वर्याची लेक आराध्यबद्दलही तेवढीच चर्चा होताना दिसते. तिच्या शाळेपासून ते तिच्या लूकपर्यंत आणि तिच्या शाळेतील कार्यक्रमातील अॅक्टींगपासून ते तिच्या एअरपोर्टवरील व्हिडीओपर्यंत. आराध्याबद्दलची बरीच चर्चा केली जाते. शिवाय तिचे जुने फोटो आणि व्हिडीओ देखील तेवढेच व्हायरल होत असतात.

लेक आराध्याच्या पार्टीत डान्स करताना दिसला अभिषेक

आताही आराध्याचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीमुळे आराध्याने नाही तर अभिषेकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक आपली लेक आराध्या बच्चनच्या पार्टीत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

अभिषेक आपल्या मुलीच्या पार्टीत लहान मुलासारखा डान्स करताना दिसला. अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबाची काळजी घेताना नेहमीच दिसतो त्यात त्याची लेक आराध्यावर तर त्याचे खूप प्रेम आहे. मुलगी आराध्याची प्रत्येक इच्छा एक बाप म्हणून तो नेहमीच पूर्ण करताना दिसतो.
अभिषेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नुकताच अभिषेक बच्चनचा एक थ्रोबॅक व्हिडिओ म्हणजेच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अभिषेक बच्चन आराध्याच्या पार्टीत मुलांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. एवढच नाही तर तो आपल्या लेकीच्या मैत्रिणींसोबत लहान मुलांप्रमाणे नाचतानाही दिसत आहे.

व्हिडिओचे युजर्सकडून कौतुक

अभिषेक बच्चनचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांन अभिषेक बच्चनचे कौतुक करत अनेक कमेंट केल्या आहेत. चाहत्यांना अभिषेक बच्चनची स्टाईल खूप आवडली.

कमेंट करताना एका यूजरने लिहिले ” खूप छान, हे सगळं फक्त एक वडीलच करू शकतात” असं लिहित त्याचं कौतुक केलं आहे. दुस-या युजरने लिहिलं आहे. ” हा रिअल फादर आहे” अशा अनेक कमेंटस् आल्या आहेत.

परफेक्ट पालक 

अभिषेक बच्चन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या, मात्र जेव्हापासून दोघेजण पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसू लागले आहेत तेव्हापासून या चर्चा आता कमी झाल्या आहेत. दरम्यान यांच्या नात्याची काहीही चर्चा असो पण दोघेही पालक म्हणून कायम आपल्या लेकीची काळजी घेताना दिसतात. पालक म्हणून ते अगदीच परफेक्ट आहेत असं म्हटलं जातं.