गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वादाच्या आणि घटस्फोटाच्या बातम्याची चर्चा सुरू आहे,अनेक अफवा पसरल्या आहेत. बऱ्याच समारंभांमध्ये, इव्हेंट्समध्ये ही जोडी वेगवेगळी दिसली. अनंत अंबानीच्या लग्नात तर संपूर्ण बच्चन कुटुंबासह अभिषेक आला होता, मात्र ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनी वेगळी एंट्री केली. त्यानंतर केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या व्हिडीओतही त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या, पण त्यात ऐश्वर्या कुठेच नव्हती. एवढँच नव्हे तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर आवर्जून शुभेच्छा देणारे अमिताभ तसेच अभिषेक या दोघांनी ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र (1 नोव्हेंबर) तिला विशही केलं नाही.
या सगळ्यांमुळेच बच्चन कुटुंबातील वाद तसेच अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरू लागला. मात्र ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांपैकी कोणीच यावर आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. याचदरम्यान अभिषेक बच्चन याचं ‘दसवी’ चित्रपटाची को-स्टार निमरत कौर हिच्या सोबत नातं असल्याच्या अफवाही जोरात फिरू लागल्या. यामुळे एकच खळबळ माजली. मात्र आता सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असन त्यामध्ये हे जोडपं खूप खुश दिसतंय. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर आता काही काळासाठी ब्रेक लागला आहे.
अभिषेक-ऐश्वर्याचे फोटो व्हायरल
फिल्म प्रोड्यूसर अनु रंजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. कारण त्या फोटोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि सासूबाई वृंदा राय यांच्यासह हसतमुखाने पोझ करताना दिसत आहे.
पत्नीसह दिली पोज
याच पार्टीचे आणखी काही फोटो अभिनेत्री आएशा जुल्का हिनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्यामध्ये ती ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत पोझ देताना दिसली. या पार्टीत ऐश्वर्याने चंदेरी वर्क असलेला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. लाल रंगाची लिपस्टीक, मोकळे सोडलेले केस या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत होती. तर अभिषेकनेही पत्नीसह ट्विनिंग करत काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा का ?
अभिषेक-ऐश्वर्याचं 2007मध्ये लग्न झालं. पण त्या दोघांमध्ये काही ठीक नाही अशी अफवा अनेक महिन्यांपासून पसरली होती. या वर्षी जुलैमध्ये, अनंत अंबानींच्या लग्नात जेव्हा ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासह नव्हे तर तिची मुलगी आराध्यासोबत हजेरी लावली होती, तेव्हा अफवा पसरू लागल्या की या बॉलिवूड पॉवर कपलचे वैवाहिक जीवन चांगले चालले नाही. पण अलीकडेच एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अभिषेक देखील त्याची मुलगी आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित असल्याचे दिसले होते. पण आता त्यांचे पार्टीमधले फोटो समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे .