मुंबई | 13 जानेवारी 2024 : बॉलिवूड सेलिब्रिटी घरातून बाहेर पडले रे पडले की फोटोग्राफर्स आणि चाहत्यांचा गराडा त्यांना पडतो. त्यामुळे बाहेर पडताना किंवा शहरात फिरायचं असेल तर ते गपचूप आपल्या कारमध्ये बसून प्रवास करतात. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याचा पर्याय तर ते सहसा निवडत नाहीत. एखाद्या सेलिब्रिटीने सार्वजनिक वाहन वापरलं तरी ते एखाद्या प्रमोशनसाठी वगैरेच असतं. त्यामुळे असं दृश्य सामान्य लोकांना फारसं पहायला मिळत नाही, त्यांच्यासाठी तर असं सेलिब्रिटींना पाहणं खास ठरतं, आणि तेव्हा लगेच त्या सेलिब्रिटींना लोकांचा गराडा पडतो. म्हणूनच जेव्हा एखादी सेलिब्रिटी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करते, तेव्हा तो चर्चेचा विषय ठरतो.
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अर्थात अक्षय कुमार याने नुकताच मुंबईतील मेट्रोने प्रवास केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा मोठा स्टार मेट्रोमध्ये आला तरी कोणीच त्याला ओळखलं नाही, ना चाहत्यांची झुंबड उडाली. X अर्थात पूर्वीचं ट्विटर यावर तसेच इन्स्टाग्रामवरही, सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो आणि निर्मात दिनेश विजन हे दोघेही मेट्रोमध्ये बसलेले दिसत आहेत.
अक्षयला कोणी ओळखलंच नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता दिनेश विजामेट्रन हे मेट्रोतून प्रवास करताना दिसले. पण अक्षयला कोणी ओळखलच नाही. त्याचं कारण म्हणे अक्षयचा पेहराव. ब्लॅक कलरची पँट, ब्लॅक जॅकेट , डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क अशा पेहरावात अक्षय कुमार हा मेट्रोमध्ये बसलेला होता. त्याचा चेहरा झाकलेला असल्याने फारशा लोकांनी त्याला कोणी ओळखलं नाही. त्यामुळे तेथे चाहत्यांची फारशी गर्दी दिसून आली नाही. ट्राफिकपासून वाचण्यासाठीच अक्षयने मुंबई मेट्रोतून प्रवास केल्याची चर्चा आहे.
या सेलिब्रिटींनीही केला होता मेट्रो प्रवास
मात्र मेट्रोतून प्रवास करण्याची अक्षयची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी मेट्रोतून प्रवास केला आहे. नुकताच अभिनेता विद्युत जामवाल याने ‘क्रॅक’चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिवसभर मेहनत केल्यावर मेट्रोने प्रवास केला होता. तर त्यापूर्वी एप्रिल महिन्यात अभिनेत्री सारा अली खान हिने मेट्रोतून प्रवास केला होता. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला होता.
तर त्याआधी बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमामालिनी यांनीही मुंबई मेट्रोतून प्रवास केला. त्यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वसामान्य प्रवासी आश्चर्यचकीत झाले होते. हेमा मालिनी यांनी स्वत: ट्विटरवर या प्रवासाचे फोटो पोस्ट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की मुंबई उपनगरातून दहिसरला पोहोचण्यासाठी त्यांना कारने दोन तास लागले होते. हा प्रवाससुद्धा खूप थकवणारा होता. म्हणूनच त्यांनी कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोमुळे त्या अर्ध्या तासात पोहोचल्या. या प्रवासादरम्यानचा व्हिडीओसुद्धा त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला. मेट्रोनंतर त्यांनी उर्वरित प्रवास ऑटोरिक्षाने पूर्ण केला. डीएन नगर ते जुहू असा प्रवास त्यांनी केला होता.
I must share with all of you my unique, wonderful experience.Drove 2 hours to reach Dahisar by car, so tiring! In the eve decided I would try the metro, and OMG! What a joy it was!True, we went thro tough times during the constr, but worth it! Clean, fast & ws in Juhu in 1/2 hr💕 pic.twitter.com/2OZPMtORCu
— Hema Malini (@dreamgirlhema) April 11, 2023