Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी कोणत्या पिक्चरमध्ये साकारला ट्रिपल रोल ?

| Updated on: Oct 11, 2024 | 10:22 AM

Amitabh Bachchan Birthday : गेल्या 55 वर्षांपेक्षा अधिक काळ अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. 130 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाऱ्या बिग बींचा आज वाढदिवस असून ते 82 वर्षांचे झाले आहेत. त्यानिमित्त त्यांच्याबद्दलचे काही अनोखे किस्से जाणून घेऊया.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी कोणत्या पिक्चरमध्ये साकारला ट्रिपल रोल ?
अमिताभ बच्चन
Image Credit source: social media
Follow us on

बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचे जहभरात कोट्यवधी चाहते आहेत. आज, 11 ऑक्टोबरला अणिताभ यांचा वाढदिवस असतो. गेल्या अनेक दशकांपासून शेकडो चित्रपटात काम करत रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अमिताभ बच्चन हे 82 वर्षांचे झाले असून आजही ते कार्यमग्न असतात, चित्रपटात तितकेच ॲक्टिव्ह असतात. 1969 साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटांतून पदार्पण करणारे बिग बी आज जरी प्रचंड यशस्वी असले तरी सुरूवातीच्या काळात त्यांनी बराच संघर्ष केला. सुरूवातीलाच त्यांनी एकामागोमाग एक असे 12 फ्लॉप पिक्चर दिले. मात्र तरीही हिंमत न हारता त्यांनी मेहनत सुरूच ठेवली. आजच्या काळात सर्वात जास्त बिझी असलेले बिग बी अनेक चित्रपटांत झळकणार आहेत.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचे काही अनोखे किस्से जाणून घेऊया. आधी त्यांना फ्लॉप स्टारचा टॅग मिळाला पण नंतर ते कसे सुपरस्टार बनले, त्यांच्यामुळे कोणत्या सुपरस्टारच्या स्टारडमला धक्का बसला आणि ते बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ कसे बनले… ते सगळं जाणून घेऊया.

अमिताभ बच्चन यांचे हे किस्से माहीत आहेत का ?

  • अमिताभ बच्चन यांचा ‘सात हिंदुस्तानी’ पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण ते सर्व फ्लॉप झाले. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात बिग बींचे एकामागोमाग एक असे 12 चित्रपट फ्लॉप झाले, त्यानंतर त्यांना फ्लॉप अभिनेत्याचा टॅग मिळाला.
  • पण जेव्हा प्रकाश मेहरा यांनी त्यांना जंजीर चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा बिग बींचे नशीब बदलले. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चन होत्या, तेव्हा त्यांचं नाव होतं जया भादुरी. जया यांच्यासोबत अमिताभची हिट ठरली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
  • अमिताभ बच्चन प्रकाश मेहरा यांच्या जंजीर चित्रपटातून प्रसिद्ध झाले. त्यांनी रातोरात एवढी प्रसिद्धी मिळवली की त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांचे स्टारडम त्यांच्यासमोर फिके पडू लागले. नंतर अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी ‘नमक हराम’ चित्रपटात एकत्र काम केले. जेव्हा मी लिबर्टी सिनेमात ‘नमक हराम’ चित्रपटाचा ट्रायल शो पाहिला तेव्हा मला कळलं की माझा काळ आता संपला आहे, असं राजेश खन्ना यांनी स्वत: एका मुलाखतीत नमूद केलं.
  • अमिताभ बच्चन यांनी गाजलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटात विजय दीनानाथ चौहान यांची भूमिका साकारली होती. या नावाने अमिताभ खूप प्रसिद्ध झाले. बिग बींनी मोठ्या पडद्यावर आत्तापर्यंत 20 वेळा ‘विजय’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे, हे फारच कमी लोकांना माहीत असेल.
  • बिग बींनी अनेक चित्रपटांमध्ये डबल रोल केला आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण 12 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. ‘महान’ चित्रपटात तर त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती.
  • जंजीर चित्रपटाच्या यशानंतर प्रकाश मेहरा यांनी स्टारकास्टला परदेश दौऱ्यावर नेण्याचा निर्णय घेतला होता. पण अमिताभ बच्चन यांच्या वडिलांना त्यांच्या आणि जयाच्या नात्याबद्दल माहिती होती. त्यामुळेच त्यांनी अशी अट घातली होती की, जयासोबत लग्न केल्यानंतरच ते दोघे (अमिताभ- जया) परदेशात जाऊ शकतात. वडिलांची अट पाहात, त्यांचा मान राखत अमिताभ आणि जया यांनी झटपट लग्न केले.
  • 1988 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘शहेनशाह’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या चमकदार अभिनयामुळे आणि त्यांच्या कारकिर्दीतील समर्पणामुळे त्यांना बॉलिवूडचा ‘शहेनशाह’ ही पदवी देण्यात आली. ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है ‘शहेनशाह’ हा चित्रपटातील संवाद हा बिग बी यांची खास ओळख बनला.
  • वयाच्या 58 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरच्या शिखरावर असताना अभिनयाचा त्याग केला आणि 2 वर्षे एकांतात गेले. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एक अपार्टमेंट विकत घेतले होते जिथे ते एकटेच राहत होते. याचा खुलासा त्यांचा सहकलाकार रजनीकांत यांनी एका मुलाखतीत केला.
  • अमिताभ बच्चन 3190 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी आपल्या मालमत्तेच्या वारसाचे नावही उघड केले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडमध्ये बिग बी म्हणाले होते की, त्यांच्याकडे जे काही आहे ते त्यांच्या मुलांमध्ये, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन या दोघांमध्ये समान प्रमाणात विभागले जाईल.