मलायका आणि अर्जुनने बोनी कपूरसह एन्जॉय केली व्हेकेशन, फोटो पाहून नेटीझन्सनी विचारलं.. तो रिश्ता पक्का समझे ?

| Updated on: May 05, 2023 | 11:19 AM

बॉलिवूड फिल्मस्टार अर्जुन कपूरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा आणि वडील बोनी कपूरसोबतचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांनी चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मलायका आणि अर्जुनने बोनी कपूरसह एन्जॉय केली व्हेकेशन, फोटो पाहून नेटीझन्सनी विचारलं.. तो रिश्ता पक्का समझे ?
Image Credit source: instagram
Follow us on

बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) अलीकडेच त्याच्या बर्लिन व्हेकेशनचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या व्हेकेशनसाठी अर्जुनसह त्याचे वडील बोनी कपूर (boney kapoor) आणि गर्लफ्रेंड मलायका अरोरा (malaika arora) हे दोघेही गेले होते. अर्जुनने पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांना त्याची गर्लफ्रेंड आणि वडील बोनी कपूरसोबतचे फोटो दाखवले. त्यानंतर चाहतेही या फोटोंच्या प्रेमात पडले.

गेल्या अनेक दिवसांपासून फिल्मस्टार अर्जुन कपूर त्याच्या युरोप व्हेकेशनमधील फोटोंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या एपिसोडमध्ये अभिनेत्याने चाहत्यांसह आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये, फिल्मस्टार अर्जुन कपूरने त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराची मजेदार शैली चाहत्यांना दाखवली आहे. हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले.

विशेष म्हणजे या व्हेकेशनसाठी त्याचे वडील बोनी कपूर हेही अर्जुन-मलायका यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोजमध्ये अर्जुन वडिलांसह निवांत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे.

या फोटोंमध्ये बोनी कपूर यांनी चविष्ट जेवणाचाही आस्वाद घेतला. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर बोनी कपूरचा हा फोटो शेअर करून चाहत्यांना व्हेकेशन ट्रिपची झलक दिली. ज्यावर त्याची बहीण जान्हवीने केलेली कमेंटही बरीच चर्चेत आली आहे. ‘ बाबा, त्यांचे डाएट काटेकोरपणे फॉलो करत असतील असं वाटलं’, अशी कमेंट जान्हवीने केली आहे.

अर्जुन कपूरने आदल्या दिवशी वडील बोनी कपूर यांच्यासोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की तो वडिलांसोबत पहिल्यांदाच युरोपला गेला आहे. हा त्याच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असल्याचे अभिनेत्याने सांगितले.

 

श्रीदेवीशी लग्न केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतचे संबंध सामान्य नव्हते. श्रीदेवीच्या मृत्यूनंतरच तो वडील बोनी कपूर यांच्या जवळ आले. आता हळुहळू या दोघांमधील अंतर संपल्याचे दिसत आहे. अभिनेत्याचे हे फोटो पाहिल्यानंतर बोनी कपूर यांनी मलायका-अर्जुनच्या नात्याचा स्वीकार केला आहे का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.