Happy Birthday Dharmendra | ‘शेतकऱ्यांचे म्हणणे एकदा तरी ऐका’, वाढदिवसाच्या निमित्ताने सुपरस्टारची सरकारकडे मागणी

| Updated on: Dec 08, 2020 | 10:37 AM

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) आज आपला 85वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Happy Birthday Dharmendra | ‘शेतकऱ्यांचे म्हणणे एकदा तरी ऐका’, वाढदिवसाच्या निमित्ताने सुपरस्टारची सरकारकडे मागणी
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) आज आपला 85वा वाढदिवस साजरा करत आहेत. धर्मेंद्रने आपल्या चित्रपट कारकीर्दीत कित्येक उत्तम चित्रपटांसह अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा आणि भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या ‘अपने 2’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच, वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मोदी सरकारला शेतकऱ्यांचे (Farmers protest) म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले आहे (Actor Dharmendra Appeals to Central Government over Farmers protest).

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले, ‘कॅमेरा हे माझे प्रेम आहे आणि कॅमेरा मला खूप आवडतो. त्याद्वारे मी स्वतःचे विश्लेषण करू शकतो आणि मला माहित आहे की, माझ्याकडे किती क्षमता आहे. मला नेहमी वाटतं की मी हे करू शकतो. मी काही करू शकत नाही, याचा अधिक विचार करत नाही. बऱ्याचदा लोक मला सांगतात की, मी 85 वर्षांचे झालो आहे. परंतु, 60 वर्षांनंतर मी माझे वय मोजणे थांबविले. मी माझे आयुष्य भरभरून जगलो. आणि मला माझ्या आयुष्याने कायम तरुण असल्याचे भासवले आहे. मी 85 वर्षांचा झालो असलो, तरी माझ्या आगामी ‘अपने 2’ या चित्रपटामध्ये वृद्ध पित्याची भूमिका साकारणार नाहीय.’

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐका…

नुकतेच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी एक ट्विट केले होते. ‘सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, देशात कोरोना प्रकरणे वाढत आहेत’, अशा आशयाचे हे ट्विट होते. मात्र, लोकांनी या ट्विटचा चुकीचा अर्थ लावून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

या डिलीट केलेल्या ट्विटविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मला फक्त असे म्हणायचे होते की, एकदा शेतकऱ्यांचे ऐका. मी नेहमी सकारात्मक बोलतो पण, लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात. ट्विटरवर राग व्यक्त केला जात आहे. आता मी स्वत:ला त्यापासून दूर ठेवीन. कारण यातून लोकांची दुखावत आहेत (Actor Dharmendra Appeals to Central Government over Farmers protest).

वाढदिवस साजरा करणार नाही!

धर्मेंद्र सध्या त्यांच्या फार्महाऊसमध्ये राहत आहेत. यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘आई देव आहे, आनंद देणारा हा देवच नाही तर मी वाढदिवस कसा साजरा करू? मी फक्त सगळ्या विधी करतो आणि एकांतात माझ्या आईच्या आठवणीत रमतो. ती असताना माझ्या वाढदिवशी शिरा तयार करायची.’

धर्मेंद्र यांच्या आगामी ‘अपने 2’ या चित्रपटात देओल कुटुंबाच्या 3 पिढ्या झळकणार आहेत. याविषयी सांगताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मी माझ्या नातवाबरोबर काम करत आहे ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. मला माहित आहे की त्याच्यात किती सामर्थ्य आहे. तो एक चांगला अभिनेता आहे आणि मला विश्वास आहे की तो त्याची भूमिका ताकदीने निभावेल.’

(Actor Dharmendra Appeals to Central Government over Farmers protest)