Govinda : आवाजात कंपन… प्रचंड भीती… मानसिक धक्का… गोळी लागल्यावर थेट रुग्णालयातून गोविंदा काय म्हणाला?

| Updated on: Oct 01, 2024 | 10:53 AM

अभिनेता गोविंदा याच्या बंदुकीतून गोळी सुटून ती पायाला लागली. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Govinda : आवाजात कंपन... प्रचंड भीती... मानसिक धक्का... गोळी लागल्यावर थेट रुग्णालयातून गोविंदा काय म्हणाला?
बंदुकीतून मिसफायर झाल्याने अभिनेता गोविंदा जखमी
Image Credit source: social media
Follow us on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या बंदुकीतून गोळी मिसफायर झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. ही गोळी गुडघ्याला लागल्याने गोविंदा गंभीर जखमी झाला, त्याला उपचारांसाठी तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान गोविंदा याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने मी बरा आहे’ असे सांगत त्याने सर्व चाहत्याचे तसेच डॉक्टरांचे आभार मानले.अभिनेता गोविंदाने हॉस्पिटलमधून पहिला ऑडियो जारी केला आहे.

काय म्हणाला गोविंदा ?

‘ माझ्या पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंच्या कृपेने मी आता बरा आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मी आता ठीक आहे. मी इथल्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मी आता ठीक आहे.त्यासाठी धन्यवाद!’ असे म्हणत गोविंदा याने ऑडिओ क्लिपद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या ( मंगळवार 1 ऑक्टोबर) सुमारास ही दुर्घटना घडली.  गोविंदा याच्या मॅनेजरने ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीनुसार, एका कामानिमित्त कोलकाता येथे जाण्यासाठी गोविंदा घरातून निघाला.  नेहमीप्रमाणे त्याने त्याची परवाना असलेली बंदूक सोबत घेतली. मात्र तेवढ्यात बंदूक त्याच्या हातातून निसटली आणि मिसफायर होऊन त्याच्या पायाला गोळी लागली. त्याच्या गुडघ्याला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.

गोविंदाला गोळी लागल्याची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली तसेच त्याला बरे वाटावे यासाठी शुभेच्छाही दिल्या.