मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता किरण माने हे नाव चांगलच चर्चेत आहे. राज्याच्या राजकारणातही किरण माने यांच्यावरून बराच वाद (Kiran Mane) झाला. याची सुरूवात झाली त्यांना मुलगी झाली (Mulgi Zali Ho) हो, या मालिकेतून काढल्यानंतर. राजकीय भूमिका घेतल्याने मला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडी किरण मानेंच्या समर्थनार्थ दिसून आली. किरण माने यांच्यावर अन्याय झालाय.त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना मालिकेत परत घ्यावं. नाहीतर मालिका चालू देणार नाही. असा इशाराही महाविकास आघाडीने दिला. त्यानंतर त्यांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले. काही महिला कलाकार त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या. त्यानंतर हा वाद काही काळच चालल्यानंतर शांत झाला. मात्र आज एका फेसबूक पोस्टने किरण माने हे नाव पुन्हा चर्चेत आलं. कारण त्यांनी एनसीबीविरोधात (Aryan Khan Drugs Case) अतिशय खरमरीत पोस्ट लिहली आहे. आणि शाहरुखचं समर्थन केले आहे.
फेसबूक पोस्टची चर्चा
किरण मानेंची फेसबूक पोस्ट काय?
आपल्या शारख्याचा ‘पठान’ पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पXXन लावला. संविधानिक मार्गानं !
एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय.
…कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोXपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्यांना ‘सिंघम’ , ‘सिंघम’ करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे !
‘बदनामी’ हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो… समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. ‘आमचा विरोध कराल तर बदनाम करू.’ असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय !
शाहरूख, लब्यू भावा. ❤️
– किरण माने.
एनसीबीचं आर्यनबाबत स्पष्टीकरण काय?
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात पुरावे नसल्याचं ठरवणं हे घाईचं होईल, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने स्पष्ट केलं आहे. आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावरूनच किरण माने यांनी ही पोस्ट लिहिली आहे. यावरून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण
अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव, पुण्यात तरुणाला दहा लाखांचा गंडा
वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू