बेक्कार… शोभितासोबत फोटो पोस्ट करताच नागा चैतन्यला ऐकावं लागलं असं काही.. थेट उचललं मोठं पाऊल

| Updated on: Oct 20, 2024 | 3:40 PM

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु यांचा घटस्फोट होऊन बराच काळ उलटला असून दोघंही आयुष्यात पुढे गेले आहेत. नागा चैतन्यने काही काळापूर्वी  अभिनेत्री शोभिता धुलिपाशी साखरपुडा केला. नुकताच त्याने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला, मात्र त्यानंतर असा गदारोळ माजला की...

बेक्कार... शोभितासोबत फोटो पोस्ट करताच नागा चैतन्यला ऐकावं लागलं असं काही..  थेट उचललं मोठं पाऊल
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला
Image Credit source: instagram
Follow us on

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु यांचा घटस्फोट होऊन बराच काळ उलटला असून दोघंही आयुष्यात पुढे गेले आहेत. नागा चैतन्यने काही काळापूर्वी  अभिनेत्री शोभिता धुलिपाशी साखरपुडा केला. नुकताच त्याने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला, मात्र त्यानंतर असा गदारोळ माजला की नागा चैतन्यला मोठं पाऊल उचलावं लागलं. नागा चैतन्य आणि शोभिताच्या त्या फोटोंवर बऱ्याच लोकांनी टीकेचा भडिमार केला. ते पाहून नागा चैतन्य याने थेट त्याचा कमेंट सेक्शनच बंद करू टाकला.

प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याचा मुलगा आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर येताच अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यांच्या नात्याची बऱ्याच काळापासून चर्चा होती, मात्र अखेर त्यांनी साखरपुडा करत त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आता 19 ऑक्टोबर रोजी नागा चैतन्य याने शोभितासोबत एक नवा फोटो शेअर केला. पण लोकांनी त्या फोटोवर जोरदार टीका केली आणि अभिनेत्याला त्याचा कमेंट सेक्शन बंद करावा लागला.

हे सुद्धा वाचा

नवीन पोस्टमध्ये, नागा आणि शोभिता दोघांनीही काळ्या रंगाचे ड्रेस घातलेला दिसत आहे. नागा चैतन्यने ग्रे टीशर्टवर काळ्या रंगाचं लेदर जॅकेट घातलं. तर शोभिताने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप, जीन्स आणि कंबरेला जॅकेट असा पेहराव केला होता. आरशात पाहून सेल्फी काढतानाचा दोघांचा हा फोटो नागा चैतन्य याने पोस्ट केला होता.

फोटो पडताच ट्रोलिंग सुरू

Everything everywhere all at once.. अशी कॅप्शनही त्याने लिहीली. मात्र त्याने हा फोटो पोस्ट करताच अनेक लाईक्स,कमेंट्सचा पाऊस पडला. पण त्या कमेंट्समध्ये निगेटीव्ह कमेंट्सच जास्त होत्या, अनेकांन त्या दोघांना ट्रोल केलं, टीकास्त्र सोडलं. सर्वात बेकार कपल – असं एका युजरने लिहीलं होतं तर धोकेबाज अशी कमेंट आणखी एकाने केली. हे पाहून नागा चैतन्य याने मोठं पाऊल उचललं. फोटो पोस्ट केल्यावर अवघ्या 20 मिनिटांच्या आतच त्याने कमेंट सेक्शनच बंद करून टाकलं. त्यामुळे कोणीही टीका करू शकणार नाही. यापूर्वी शोभिता सोबतच्या साखरपुड्याचे फोटो टाकल्यावरही त्या दोघांना बऱ्याच टीकेचा, ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

 

नागा चैतन्य – समांथा रुथ प्रभु यांचा घटस्फोट

अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी 2017 साली थाटामाटात लग्न केलं पण 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नानंतर चार वर्षांच्या आतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनीही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात साखरपुडा झाला. लवकरच ते लग्न करणार आहेत.