Nakuul Mehta’s Dance In Skirt : अभिनेता रणवीर सिंग सोडला तर तुम्ही इतर कोणत्याही बॉलिवूड अथवा टीव्ही अभिनेत्याला स्वत:च्या मर्जीने स्कर्ट घातलेलं पाहिलं आहे का ? नाही ना ! पण टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता असा आहे, ज्याने स्कर्ट तर घातला आहेच पण तो घालून एका गाण्यावर भन्नाट डान्सही केलाय आणि चाहत्यांना सुखद सरप्राईज दिलं आहे. हो, आपण बोलतोय नकुल मेहता (Nakuul Mehta) या अभिनेत्याबद्दल… बडे अच्छे लगते है या मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये भूमिका करणारा नकुल हा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
नकुल मेहताने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्याच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नकुल मेहता आणि डान्सर जैनील मेहता हे दोघेही गुलाबी स्कर्ट घालून डान्स करताना दिसत आहेत. जैनील आणि नकुल या दोघांनीही स्कर्ट घालून मस्त डान्स केला आहे. दोघेही रणबीर कपूरच्या रॉकस्टार चित्रपटातील हवा हवा या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत.
जैनीलचा डान्स पाहून घेतला व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला
इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना नकुल मेहताने एक खास कॅप्शन लिहिली आहे. त्याने लिहिले की, ‘मी काही महिन्यांपूर्वी BRUT व्हिडिओमध्ये
@jainil_dreamtodance याला न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर ढोली तारो गाण्यावर सुंदर डान्स करताना पाहिले होते. आणि मी लगेच त्याची कला आणि स्पिरीट याकडे आकर्षित झाले. तर त्याला माझी मालिका बघायला खूप आवडते, असे त्याने नमूद केले आहे.
सोशल मीडियावर होतंय खूप कौतुक
नकुलच्या या डान्सचं कौतुक होत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे नकुलच्या डान्सने स्टिरिओटाईपला ब्रेक लावला. हिरो कधीच मुलीचे कपडे घालू शकत नाहीत, पुरुषांना वेदना होत नाहीत, असे संवाद मागे सोडून नकुल आत्मविश्वासाने नाचला, त्याचे धाडस पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.
चितत्रपटातून केली होती करिअरची सुरूवात
नकुलने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून केली होती पण आज तो टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. नकुल 2008 मध्ये इंडस्ट्रीत आला पण त्याला ‘प्यार का दर्द है , मीठा-मीठा प्यारा-प्यारा’ मधून ओळख मिळाली. अभिनयासोबतच नकुल त्याच्या विनोदबुद्धीनेही लोकांना प्रभावित करतो.