मुंबई : सुपरस्टार आमिर खान (Amir Khan) याच्या पाठोपाठ दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेता आर माधवनला (R Madhavan) कोरोनाची लागण झाली आहे (R madhavan Corona Positive). ट्विट करुन त्याने ही माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या थ्री एडियट्स चित्रपटाच्या संवादाचा दाखला देत कोरोनाची लागण झाल्याचं ट्विट आर माधवनने केलं आहे. शिवाय ही एकच जागा आहे की जिथे आम्हाला राजू नको, असंही माधवनने म्हटलं आहे. (Actor R madhavan tested Corona positive After Amir Khan test Corona positive)
कोरोनाची लागण झालीय. मात्र मी ठीक आहे तसंच लवकरच मी कोरोनावर मात करेन, असा विश्वास माधवनने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. आमिर आणि स्वत:चा फोटो ट्विट करत थ्री एडियट्स चित्रपटाची आठवण यानिमित्ताने जागवत माधवनने कोरोनावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.
फरहान रँचोला फॉलो करतो आणि व्हायरस नेहमीच त्यांना फॉलो करतो. यावेळी व्हायरसने आम्हाला गाठलं आहे. पण मी ठीक आहे, बरा आहे आणि लवकरच मी या कोरोनावर मात करेन… ही एकच अशी जागा आहे तिथे आम्हाला राजू नकोय, असं म्हणत मित्राविषयी वाटणारं प्रेम आणि कळकळ आर माधवनने आपल्या ट्विटमधून दाखवून दिली आहे.
Farhan HAS to follow Rancho and Virus has always been after us BUT this time he bloody caught up. ????BUT-ALL IS WELL and the Covid? will be in the Well soon. Though this is one place we don’t want Raju in??. Thank you for all the love ❤️❤️I am recuperating well.??? pic.twitter.com/xRWAeiPxP4
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) March 25, 2021
राजकुमार हिरानी दिग्दर्शित थ्री एडिएट्स या सुपर डुपर हिट चित्रपटात आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी सोबत काम केलं. तीन मित्रांच्या कॉलेज जीवनावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट संपूर्ण देशाने डोक्यावर घेतला तसंच परदेशातही याचे कित्येक शोज झाले. तरुणाईला या चित्रपटाची भुरळ पडली. या चित्रपटाने हुशारीची व्याख्याच बदलून टाकली.
आमिर खानला कोरोनाची लागण
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.आमिर खान सध्या होम क्वारंटाईन आहे. आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशन “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत होते. यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यादेखील सहभागी होत्या. त्याशिवाय समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमातील अनेक व्यक्ती क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. (Aamir Khan tested corona positive)
हे ही वाचा :