मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा गेल्या बऱ्याच वर्षांपासून (Varun Dhavan And Natasha Wedding) एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान, अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा झाल्या. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाबाबत माहिती समोर आली आहे. वरुण आणि नताशा याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. हे दोघ अलीबागमध्ये लग्न करणार आहेत. यावेळी दिग्दर्शक आमि वरुणचे वडील डेविड धवन एका शानदार पार्टीचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे (Varun Dhavan And Natasha Wedding).
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, वरुण धवन नुकताच पंचतारांकित हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होते. यांचं लग्न धुमधडाक्यात होईल पण कोरोनाच्या नियमांमुळे अलीबागमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडेल.
ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. “आता लग्न करुनच घ्या”, असा सल्ला वरुणच्या चाहत्यांनी त्याला दिला आहे (Varun Dhavan And Natasha Wedding).
काही दिवसांपूर्वी वरुणला त्याच्या लग्नाबाबत विचारण्यात आला होता. तेव्हा “गेल्या दोन वर्षांपासून सर्वे हाच प्रश्न विचारत आहेत. आता परिस्थिती ठिक नाहीये. जर परिस्थिती सुधारते तर कदाचित या वर्षी लग्न करु शकतो. मी लवकरात लवकर लग्न करण्याचा प्लान करत आहे. पण सध्या याबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही”, असं उत्तर वरुणने दिलं होतं.
यापूर्वी, गेल्या वर्षीही वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. लग्नाचं ठिकाणंही निश्चित करण्यात आलं आहे, अशीही माहिती होती. पण, त्यानंतर कोरोनामुळे ही लग्न होऊ शकलं नाही. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यामुळे आतातरी याचं लग्न होतं की पुन्हा एकदा या चर्चा अफवा ठरतात हे पाहावं लागेल.
PHOTO | ‘वेकेशन ट्रीप’साठी वरुण धवन मालदीवमध्ये, ‘नताशा कुठेय?’ नेटकऱ्यांचा सवाल!https://t.co/UNp6Md6hu7@Varun_dvn #Maldives
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
Varun Dhavan And Natasha Wedding
संबंधित बातम्या :
Ekkis | वरुण धवन बनणार आर्मी ऑफिसर, ‘अंदाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन साकारणार ड्रीम प्रोजेक्ट!
Photo : सारा आणि वरुण लग्नबंधनात ?, अरे हे तर चित्रपटाचं प्रमोशन
नीतू कपूरनंतर वरुण धवनने केली कोरोनावर मात, लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार!