अभिनेत्री अक्षरा सिंह गिरवणार राजकारणाचे धडे, लोकसभा निवडणूक लढविणार

| Updated on: Nov 28, 2023 | 9:31 PM

एकामागून एक हिट चित्रपट देऊन तिने करिअरमध्ये आपले खूप नाव कमावले आहे. दिलवाला, सत्यमेव जयते, सौगंध गंगा मैया की, सत्या, तबला, माँ तुझे सलाम यासारख्या चित्रपटांमध्ये अक्षरा सिंह दिसली होती.

अभिनेत्री अक्षरा सिंह गिरवणार राजकारणाचे धडे, लोकसभा निवडणूक लढविणार
AKSHARA SINGH AND PRASHANT KISHOR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

बिहार | 28 नोव्हेंबर 2023 : चित्रपटांमध्ये काम करून नाव आणि पैसा मिळविणाऱ्या अनेक कलाकारांना राजकारणाचे प्रवेशद्वार खुणावत असते. चिराग पासवान, किरन खेर, हेमा मालिनी, गोविंदा, परेश रावल, मुनमुन सेन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, आधिकारी दीपक, बाबुल सुप्रीयो, भगवंत मान, जयाप्रदा, रवी किशन, जया बच्चन, स्मृती इराणी असे चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार यांनी लोकसभेपर्यंत मजल मारली. यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी अशी ही एक अभिनेत्री आहे.

भोजपुरी चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अक्षरा सिंह हिने राजकारणात प्रवेश कारणाचा निर्णय घेतला आहे. अक्षरा हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज अभियानात ती सामील झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ती जनसुराज पक्षाची उमेदवार असणार आहे.

अभिनेत्री अक्षरा सिंह हिने बिहारची राजधानी पाटणा येथील पक्ष कार्यालयात जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले. काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंह हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ती राजकारणात येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी अक्षरा हिने आपण राजकारणात येणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षात सामील होणार नाही असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच अक्षरा हिने जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले.

आपण राजकारण येणार नाही. परंतु, आपण समाजासाठी योगदान देणाऱ्या एका चांगल्या मोहिमेशी जोडले आहोत असे तिने स्पष्ट केले. जनसुराज अभियान हे प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा प्रचार करणारे आहे. यात आता अक्षरा सिंह सामील झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणुक ती लढविणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अभिनेत्री अक्षरा सिंह हिने याबाबत स्पष्टीकरण देताना सध्या कोणत्याही जागेवरून निवडणूक लढविणार नाही. पण पुढे बघू. अशा स्थितीत आगामी काळात काहीही होऊ शकते असे संकेत दिले आहेत. अक्षरा सिंह हिने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले आहे. सुपरस्टार रवी किशन यांच्यासोबत तिने चित्रपटात पदार्पण केले.