अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. या वर्षाच्या सुरूवातीलाच, फेब्रुवारी महिन्यात अनुष्का आणि विख्यात क्रिकेटर विराट कोहली हे दोघे दुसऱ्यांदा पालक बनले. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अकाय ठेवण्यात आलं. काही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विराट अनुष्काने मुलाच्या जन्माची घोषणा करत त्याचं नाव सर्वांनाच सांगितलं. ज्या क्षणी विराट अनुष्काच्या मुलाच्या नावाची घोषणा झाली सोशल मीडिया त्याच्या नावाने गाजू लागलं. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या नावाचा अर्थ सर्च करण्यास सुरूवात केली. अकायचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती.
अनुष्का – विराटचा मुलगा अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने 2024 या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. अकायचा अर्थ काय हा सर्च गुगलवर दुसऱ्या स्थानी आहे.
काय आहे अकायचा अर्थ ?
विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं. मात्र या वेगळ्याच अशा नावाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला. अकायचा अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो. त्याच्या या आगळ्या वेगळ्या नावची सतत चर्चा होत असते. त्यांच्या मुलीचं नावही असंच वेगळं आहे. वामिका असं तिचं नाव असून त्याचा अर्थ दुर्गा देवी असा होतो. दोन्ही मुलांची अर्थपूर्ण नाव ठेवलेल्या विराट-अनुष्काने त्यांना सोशल मीडिया आणि पापाराझींपासून मात्र दूर ठेवलं आहे. त्यांनी कधीच त्या दोघांचा चेहरा मीडियासमोर किंवा जगासमोर आणलेला नाही.
अनुष्का आणि विराटने एका खासगी समारंभात इटलीमध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये मुलगी वामिकाचा जन्म झाला तर 2024 फेब्रुवारीमध्ये मुलगा अकायचा जन्म झाला.
अशी केली होती अकायच्या नावाची घोषणा
फेब्रुवारीत मुलाचा जन्म झाल्यावर 4-5 दिवसांनी विराट-अनु्ष्काने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुड न्यूज शेअर करत मुलाचं नावंही सर्वांना सांगितलं होतं. ‘ आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिका हिला एक छोटा भाऊ मिळाला आहे. तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे. आमच्या प्रायव्हसीचा मान राखावा,’ अशी विनंतीही त्यांनी या पोस्टमधून केली होती.