Happy Birthday Deepika : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस, चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Jan 05, 2021 | 11:26 AM

आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण आज तिच्या 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.(Actress Deepika Padukone's birthday, a shower of good wishes from fans on social media)

Happy Birthday Deepika : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस, चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
अभिनेत्री दीपिका पदुकोण
Follow us on

मुंबई : आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिच्या 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेले अनेक वर्ष केलेल्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये दीपिकानं स्वतः एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज दीपिका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. कारण तिच्या कुटुंबाचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. अशा परिस्थितीत दीपिकासमोर सर्वात मोठे आव्हान होतं ते स्वत: ला सिद्ध करण्याचं आणि तिनं ते करुन दाखवलं.

आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एवढंच नाही तर ट्विटरवर #HappyBirthdayDeepikaPadukone असं हॅशटॅग ट्रेंडही होऊ लागलं आहे. तिचे चाहते वेगवेगळ्या अंदाजात तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी तिचे फोटो कोलाज शेअर करत शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर आज दीपिका सगळीकडे ट्रेंडमध्ये आहे.

दीपिकानं तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. आज दीपिका चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त फी आकारणारी अभिनेत्री ठरली आहे. तिचा जन्म 5 जानेवारी 1986 ला झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकासुद्धा एक प्रोफेशनल बॅडमिंटनपटू आहे.