मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले. अभिनेत्री ईशा देओल-भरत तख्तानी यांचा घटस्फोट असो किंवा टेनिस स्टार सानिया मिर्झा- क्रिकेटर शोएब मलिक यांचं विभक्त होणं.. या सगळ्या बातम्या अनपेक्षिततरित्या समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. आता त्यातच आणखी एका सेलिब्रिटीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला हिने तिच्या नावासमोरून तिच्या पतीचं आडनाव हटवलं आहे. दिव्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर दिव्या खोसला कुमार या नावाने तिचं अकाऊउंट उघडलं होतं. पण आता त्यावर तिचं नाव केवळ दिव्या खोसला एवढंच दिसत आहे. इतकंच नव्हे तर या अभिनेत्री टी-सीरिजलाही अनफॉलो केलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेक अटकळीही बांधल्या जात आहेत.
दिव्या आणि तिचा पती, टी-सीरिजचा मालक भूषण कुमार यांच्यात काही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. लवकरच ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. दिव्याने तिची पर्सनल लाइफ नेहमीच प्रायव्हेट ठेवली आहे पण आता दिव्या आणि भूषणमध्ये काही बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली आहे. इंटरनेटवर , दिव्याच्या इन्स्टा प्रोफाईलचा स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल होतआहे. तिच्या नावापुढे ती पतीचं नावही लावायची, मात्र आता तिने ते हटवलंय, असा दावाही त्यामध्ये करण्यात आला आहे.
एका रेडिट पोस्टनंतर दिव्या-भूषण कुमारच्या नात्याबद्दल विविध चर्चांनी जोर धरला आहे. दिव्या आणि भूषण विभक्त होणार का, असा प्रश्नही काही जण विचारत आहेत. मात्र दोघांकडूनही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आगामी चित्रपटामुळे चर्चेत दिव्या
दिव्या खोसला सध्या तिच्या ‘हीरो हिरॉईन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. याआधी ती ‘यारियां -2’ (2023) आणि ‘सत्यमेव जयते – 2’ (2021) या चित्रपटांमध्ये झळकली होती.
दिव्या-भूषणची पहिली भेट
दिव्या आणि भूषण यांची पहिली भेट ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. येथूनच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2005 रोजी जम्मूच्या वैष्णो देवी मंदिरात भूषणसोबत दिव्याने लग्न केले. कुमार भूषण हे दिवंगत गुलशन कुमार यांचे पुत्र आहेत. दिव्या ही त्यांची सून आहे. दिव्या आणि भूषण यांच्या वयात १० वर्षांचं अंतर आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळपास २० वर्ष होत आली आहेत. अशातच दिव्याने तिच्या नावासमोरून पतीचं आडनाव हटवल्याने विविध चर्चांनी जोर धरला आहे.