मुंबई : ‘बिग बॉस फेम’ अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ गौहर आणि जैद दरबार (Zaid Darbar) यांच्या बेडरूममधला आहे, ज्यात दोघेही अगदी कॅज्युअल स्टाईलमध्ये दिसत आहेत. जैदने बनियन व शॉर्ट्स परिधान केल्या आहेत, तर गौहरदेखील कॅज्युअलमध्ये लूकमध्ये दिसली आहे. परंतु, त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ जसजसा पुढे जातो, तसतसे चाहत्यांना आपले हसणे थांबवणे कठीण होते (Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video).
या क्युट व्हिडीओमध्ये जैद दरबार पत्नी गौहर खान हिच्या डोक्याजवळ पाय ठेवताना दिसला आहे. स्वत: गौहरसुद्धा या व्हिडीओमध्ये आपले हसू थांबवू शकली नाही. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गौहर खानने लिहिले की, ‘एक प्रेम असही…’ व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ओम शांती ओम चित्रपटातील गाणे वाजत आहे आणि या रोमँटिक ट्रॅकसह या दोघांची केमिस्ट्री देखील खूपच सुंदर दिसते आहे.
काही तासांतच लोकांनी लाखोंच्या संख्येने हा क्युट व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘कोणालाही मान्य असेल की नाही, हे मला माहित नाही, पण तुम्ही हसता तेव्हा तुम्ही खूप आकर्षक दिसता.’ दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, ‘आधी मला वाटले की, हा त्याचा हात आहे.’ त्याचप्रमाणे एका माणसाने लिहिले की, ‘अरे देवा, हे त्याचे पाय आहेत.’(Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video)
गौहर खानचा हा व्हिडीओ इतक्या स्मार्ट पद्धतीने शूट केला आहे की, बर्याच वापरकर्त्यांना सुरुवातीला असे वाटले की, जैदने गौहरवर हात ठेवले आहेत. पण ही क्लिप जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे सर्व आणखी आश्चर्यचकित होत जातात. गौहर खान ही ‘बिग बॉस सीझन 14’चा देखील एक महत्त्वपूर्ण भाग होती. तिला ‘तूफानी सिनिअर’ म्हणून बिग बॉसच्या घरात आणले गेले होते. परंतु, काही आठवड्यांनंतर ती या घराबाहेर पडली होती.
काहीच महिन्यांपुर्वी ही जोडी विवाह बंधनात अडकली. जेव्हा जैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण, खुद्द गौहर हिने यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गौहरने आपण जैदपेक्षा काही वर्षांनी मोठी असल्याची बाब कबुल केली. मात्र, जैदला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नसल्याचे देखील तिने म्हटले होते.
(Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video)
Photo: साक्षी मलिकचा हॉट अवतार, सोशल मीडियात ‘खलीवली’
Religion Change : प्यार दिवाना होता हैं…, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी केलं धर्म परिवर्तन