Kangana Ranaut Video : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती अतिशय रोखठोकही बोलते. ती कधी, कोणाबद्दल, काय वक्तव्य करेल याची कोणालाच कल्पना नसते. सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असलेली कंगना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्सही देत असते. कंगनाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेता सलमान खानसोबतचा (Salman Khan) व्हिडीओ शेअर करत कंगना नॉस्टॅल्जिक झाली होती.
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती सलमान खानच्या दस का दम गेली होती. हा खूपच फनी व्हिडिओ असून त्यामध्ये तिने घाघरा आणि डोक्यावर ओढणी घेऊन डान्सही केला. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या सुप्रसिद्ध ‘धक धक करने लगा’ या लोकप्रिय गाण्यावरही कंगनाने डान्स केला. तिच्या या स्पिरीटसाठी सलमानने तिचे कौतुकही केले आहे.
एवढेच नव्हे तर सलमानही तिच्यासोबत काही डान्स स्टेप्सही केल्या. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून दोघेही हा डान्स खूप एन्जॉय करताना दिसतात.
कंगनाचा हा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकही तिला चिअर करत टाळ्या वाजवल्या. आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही हा व्हिडीओ शेअर करत सलमानला टॅग करत लिहिले, ‘OMG!!! SK आपण इतके तरुण का दिसतो ?? याचा अर्थ आपण आता नाही आहोत का?’ यानंतर तिने हसणारे काही इमोजीही शेयर केले आहेत.
कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स
कंगना राणौत अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉलिवूडमध्ये महिला आणि कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावावर उघडपणे बोलली. त्यामध्ये तिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांवर निशाणा साधला. कंगनाचा शेवटचा प्रदर्शित झालेला ‘धाकड’ हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता कंगना टिकू वेड्स शेरू, तेजस, इमर्जन्सी आणि चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे.