मुंबई : बॉलीवूडची बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. 2020 मध्ये कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग बीएमसीने पाडला (demolition) होता. ज्यामुळे कंगना खूप संतापली होती आणि तिने उघडपणे अनेक वक्तव्येही केली होती. त्याच वर्षी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली होती. सोशल मीडियावर कंगनाचे चाहते तिला अनेकदा नुकसानभरपाईबाबत प्रश्न विचारतात.
सप्टेंबर 2020 मध्ये, तिला नोटीस बजावल्यानंतर एका दिवसात, कंगनाच्या घर-कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर बांधकामामुळे पाडण्यात आला. त्यावेळी कंगना आणि शिवसेना यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू होते. अशा परिस्थितीत कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान घराचा एक भाग पाडल्याच्या भरपाईबाबत प्रश्न केला. त्यावर कंगनाने जे उत्तर दिले, ते ऐकून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.
कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिला कोणतीही भरपाई मिळालेली नाही, ते तिला एक मूल्यांकनकर्ता (evaluator) पाठवणार होते. त्यामुळे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कंगना पुढे म्हणाली की तुम्हीच मला मुल्यांकन करून पाठवा. करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करणारे इतर कोणी मला नकोत. मला आणखी भरपाई नकोय, जे आहे ते ठीक आहे असेही कंगनाने नमूद केले
ती पुढे म्हणाली, “न्यायालयाने सांगितले आहे की त्यांनी मला कितीही नुकसान भरपाई द्यावी, परंतु मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधीही मूल्यांकनकर्त्यांना पाठवले नाही आणि मी मागणी केली नाही कारण मला करदात्यांच्या पैशाची माहिती आहे आणि मला त्याची गरज नाही.”
कामाबद्दल सांगायचे झाले तर कंगना इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनातही पाऊल टाकणार आहे.