मुंबई : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा आज 49 वा वाढदिवस आहे (Actress Namrata Shirodkar Birthday). नम्रता शिरोडकरचा जन्म 22 जानेवारी 1972 ला मुंबईत झाला होता. नम्रता त्याकाळातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक होती. तेव्हाच्या काळात तिचे पोस्टर्स जवळपास सर्वांच्या घरी लागलेले दिसायचे. सिनेमांमुळेच नाही तर ही अभिनेत्री तिच्या व्यक्तीगत आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत होती (Actress Namrata Shirodkar Birthday).
नम्रता शिरोडकरने दाक्षिणात्या सिनेमांचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबूशी लग्न केलं. त्या दोघांची पहिली भेट ही एका सिनेमाच्या शूट दरम्यान सेटवर झाली होती. ही भेट इतकी खास ठरली की दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना प्रेमाची सुरुवात झाली.
नम्रता शिरोडकरने 1993 मध्ये फेमिना मिस इंडियाचं टायटल जिंकलं होतं. तिने सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा फ्लॉप झाला. पण, नम्रताचं काम पाहून तिला अनेक मोठे ऑफर मिळण्यास सुरुवात झाली. यापैकीच एका सिनेमात तिला महेश बाबूसोबत मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली.
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या वामसी या सिनेमादरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांची भेट झाली होती. सिनेमादरम्यान हे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर हे चार वर्षांपर्यंत रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर या दोघांनी 2005 मध्ये लग्न केलं.
लग्नानंतर नम्रता सिनेसृष्टीपासून दूर गेली. नम्रता आणि महेश बाबू यांना दोन मुलं आहेत. नम्रता सोशल मीडियावर नेहमीच आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते (Actress Namrata Shirodkar Birthday).
वाढदिवस साजरा करण्यासाठी नम्रता पती आणि मुलांसोबत दुबईला गेली आहे. आज नम्रताचा लुक पुर्णपणे बदललेला आहे.
नम्रताला 2004 मध्ये ‘इंसाफ’ आणि ‘ब्राइड एंड प्रिज्युडिस’ या सिनेमांमध्ये शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यानंतर तिने अद्याप सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेलं नाही.
Actress Namrata Shirodkar Birthday
संबंधित बातम्या :
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीची दुबईत धमाल!
आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…
संकटाला धावून येणाऱ्या सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु, अशा प्रकारे करणार लोकांची मदत
‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…!