अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिचा बॉलिवूड डेब्यू होऊन बराच काळ लोटला आहे. तिचं नाव गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा, इब्राहिम अली खान याच्याशी जोडलं जात आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र ते कितंपत खरं हे माहीत नाही, पण असं असलं तरी ते बरेच वेळा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. पलककडे इब्राहिमचं जॅकेटही दिसलं होतं, काही मूव्ही डेट्स, पार्टीजमध्येही ते एकत्र दिसतात. पण त्या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही की मौन सोडलं नाही. याचदरम्यान पलक आणि इब्राहिम पुन्हा स्पॉट झाले, तेही मुंबई एअरपोर्टवर.
पलक आणि इब्राहिमचा व्हिडीओ व्हायरल
पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावर ते दोघे दिसले, मात्र वेगवेगळे. त्यावेळी पलक काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स आणि गॉगल घालून होती. तर दुसरीकडे इब्राहिम अली खान हा मात्र त्याचा चेहरा लपवून मीडियाला टाळताना दिसला. विमानतळावर पलक आणि इब्राहिम एकाच वेळी दिसले. मात्र, दोघेही पापाराझीपासून अलगद सुटका करून निघण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण मीडियाने, फोटोग्राफर्सनी अखेर त्यांना गाठलंच. रिपोर्ट्सनुसार, पलक आणि इब्राहिम दोघांनीही एकत्र नव वर्ष साजरं केलं, सुट्टी एकत्र घालवली आणि मग ते मुंबईला परतले.
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. पतौडी कुटुंबाची सून,अस एका युजरने लिहीलं. तर पतौडी कुटुंबातील सुनेचे स्वागत आहे असं आणखी एकाने लिहीलं. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय असा संशय एकाने व्यक्त केला. पण आम्ही एकमेकांना डेट करत नाहीयोत, असंही हे आता म्हणतील अशी कमेंट आणखी एका यूजरने केली. त्यांची जोडी अनेकांना आवडताना दिसत्ये, आता हे त्याचं नात अधिकृतपमे मान्य करतात का याकडे अनेकांचं लक्ष आहे.