Poonam Pandey : पूनम पांडे लग्न करत्ये ? दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली, ही बातमी…

| Updated on: Nov 30, 2024 | 12:28 PM

2020 मध्ये पूनम पांडेने चित्रपट निर्मात आणि दिग्दर्शक सॅम बॉम्बेशी गुपचूप लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. तिने सॅमवर गंभीर आरोप लावले होते , त्याने तिला मारहाण केल्याचे आरोपही पूनमने केले. आता पूनमने पुन्हा लग्न करण्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ही न्यूज... काय म्हणाली पूनम पांडे ?

Poonam Pandey : पूनम पांडे लग्न करत्ये ? दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली, ही बातमी...
पूनम पांडे
Follow us on

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. तिचा सिझलिंग अंदाज आणि बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या पूनमला नेहमी लाईमलाइटमध्ये कसं रहायचं हे माहीत आहे. काही काळापूर्वी ती तिचं लगन्, भांडणं यामुळेही चर्चेत होती. तर त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या मृत्यूची खोटी अफवा फसरवली होती. ज्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच ती पापाराझींच्या क2णेऱ्यात फार कैद झाली नव्हती. पण आता नुकतीच ती एका इव्हेंटमध्ये दिसली. आणि तिथे ती चक्क लग्नाबद्दल बोलत होती.

वाद आणि पूनम पांडे हे जुनं समीकरण आहे. सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवल्यानंतर तिला लोकांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण हे केल्याचा पूनमने दाव करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर नुकतीच ही अभिनेत्री लग्नाबाबत बोलताना दिसली.

लग्नाचा प्रश्न विचारल्यावर काय म्हणाली पूनम ?

खरंतर, वास्तविक, पूनम पांडे नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान पूनमला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर तिने अतिशय मजेशीर उत्तर दिले. पूनम म्हणाली, ‘लग्न करण्याची बातमी ही आनंदाची कशी असू शकते? मला सांगा लग्न झाल्यावर किती लोक सुखी आहेत… आपण रोजच अनेक घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो, असे पूनमने म्हटलं.

 

मुनव्वर फारुखीबद्दलही बोलली पूनम

यानंतर पूनमला तिचा मित्र मुनावर फारुकीबद्दल चौकशी करण्यात आली. नो कमेंट्स असं गमतीने म्हणत पूनम तिथून सटकली.

मृत्यूच्या अफवेमुळे झाली होती ट्रोल

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती. सर्व्हायकल कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या बातमीमुळे सेलिब्रिटींसह पूनमच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र काही वेळाने तिने समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगत कॅ्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी ही खोटी अफवा पसरवल्याचे सांगितले. तिला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती.