नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो शेअर करतेय.
प्रिया प्रामुख्यानं मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय आता '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2000 सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामध्ये भूमिका साकारुन प्रियानं अभिनयाची सुरुवात केली होती.
बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.
आता तिचं हे सुंदर फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. निळ्या रंगाच्या या क्लासी कपड्यांमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.