मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने फिल्मी जगात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तिला इतरांनाही स्वतःप्रमाणे या क्षेत्रात चमकण्याची संधी द्यायची आहे. ती प्रत्येक प्रतिभेचे समर्थन करताना दिसते. ज्यामध्ये तिला टॅलेंट दिसते, पुढे जाण्याची जिद्द दिसते त्या प्रत्येक व्यक्तीला प्रियंका मदत करते. आता यावेळी प्रियंका ‘बिट्टू’ चित्रपटाच्या स्टारकास्टला मदत करणार आहे. ‘बिट्टू’ हा ऑस्करसाठी नामांकन मिळालेला भारतीय चित्रपट आहे (Actress Priyanka Chopra joins hands to Oscar nominated bittu team for better education to girls).
‘बिट्टू’ चित्रपटाचे दिग्दर्शन करिश्मा देव दुबे यांनी केले आहे. ऑस्करमध्ये प्रवेश होण्यापूर्वी हा चित्रपट इतर 18 चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि बर्याच पुरस्कारांवर या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. त्याचवेळी, करिश्माला ‘बिट्टू’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्या राणी आणि रेणूने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. इतक्या लहान वयात त्यांनी केलेला अभिनय पाहून प्रत्येकजण त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहे. उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या या राणी आणि रेणू एका गरीब कुटुंबातील आहेत. या चित्रपटाद्वारे या दोन्ही कलाकारांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. सध्या त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे.
या भागातील मुलींना सुविधा पुरवण्यासाठी ‘Indian Women Rising’च्या वतीने निधी जमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या निधीच्या मदतीने राणी आणि रेणू यांचे शिक्षणाला हातभार लावला जाईल. तसेच, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील. प्रियंकानेही स्वत:ला या मोहिमेशी जोडले आहे. ती केवळ तिच्या वतीने निधी देणार नाही, तर एका व्हिडीओद्वारे तिने इतर सर्व लोकांना पुढे येण्यास आणि मदत करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय प्रियंकानेही सर्वांना ‘बिट्टू’ चित्रपट पाहण्यास सांगितले आहे. हा सुंदर चित्रपट पाहून लोक निराश होणार नाहीत, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे (Actress Priyanka Chopra joins hands to Oscar nominated bittu team for better education to girls).
बिट्टूच्या कथेबद्दल बोलायचे, तर ही कथा अशा दोन मुलींच्या मैत्रीवर आधारित आहे, ज्या एकमेकींसाठी आपले जीवन व्यतीत करण्यास तयार आहेत. परंतु, त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडते, ज्यामुळे या दोन्ही मुलींना शाळेत विष दिले जाते. इथून या कथेत काय नाट्यमय वळण येते, हे ‘बिट्टू’ या चित्रपटात दाखवले आहे. ऑस्कर-नामांकित फिल्म ‘बिट्टू’ ची दिग्दर्शिका करिश्मा देव दुबे यांनी आठ आणि दहा वर्षांच्या दोन मैत्रिणींच्या जीवनाचा संघर्ष सांगितला. खऱ्या आयुष्यातही आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होणे अतिशय कठीण आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे.
(Actress Priyanka Chopra joins hands to Oscar nominated bittu team for better education to girls)
सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटवर संतापले नेटकरी! सोशल मीडियावर ट्रेंड केला #WhoTheHellAreUSonuSood
PHOTO | ‘साज ह्यो तुझा…’ ग्लॅमर गर्ल स्मिता गोंदकरचा मराठमोळा ‘नऊवारी’ थाट! पाहा खास फोटो…