Sonakshi Sinha | बॉलीवुडच्या ‘दबंग गर्ल’च्या अडचणी वाढल्या, लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| Updated on: Feb 08, 2024 | 9:41 AM

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरसह दोन जणांवर गुन्हा दाखल आहे.

Sonakshi Sinha | बॉलीवुडच्या दबंग गर्लच्या अडचणी वाढल्या, लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Follow us on

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरसह दोन जणांवर अटॅचमेंटचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणात मॅनेजर मालविका पंजाबी व्यतिरिक्त धोमील ठक्कर आणि गर्ल शकरिया यांची नावं समोर आली आहेत.

या तिघांविरुद्ध सोनाक्षी सिन्हाच्या नावावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाला हायकोर्टाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती मिळाली आहे. वकिलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलम 82 अन्वये तिन्ही आरोपींविरुद्ध कुर्कीचे आदेश देण्यात आले आहेत.

सोनाक्षीच्या नावे लाखोंची फसवणूक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या नावावर ज्या तिघांनी लाखो रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्याविरुद्ध कुर्कीचे आदेश देण्यात आले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. पण या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली ते समजून घेऊया. ही घटना 2019 सालची आहे. तेव्हा सोनाक्षी सिन्हा आणि इतर काही लोकांवर मुरादाबादच्या कटघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही केस शिवपुरी येथील प्रमोद शर्मा यांनी दाखल केली होती. त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आणि तिच्या टीमवर काही आरोप केले आहेत.

खरंतर प्रमोद शर्मा हे फिल्मस्टार्सना बोलावून त्यांचा कार्यक्रम आयोजित करतात. अशाच एका कार्यक्रमासाठी सोनाक्षी सिन्हालाही आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी होणार होता. पण सोनाक्षी सिन्हाने शेवटच्या क्षणी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला, असा आरोप प्रमोद शर्मा यांनी केला होता. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इव्हेंट मॅनेजरने अभिनेत्रीच्या मॅनेजरकडे फी भरल्यामुळे हे प्रकरण वाढले. याशिवाय राउंड ट्रिपचे भाडेही दिले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी नकार दिल्याने शर्मा यांचे मोठे नुकसान झाले.

कार्यक्रम रद्द झाल्यानंतर प्रमोद शर्मा यांनी या लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांनी, भरलेली फी परत मागितली. मात्र अभिनेत्रीकडून, ती मिळालेली रक्कम परत करण्यास नकार आल्याने शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले. आता बुधवारी याप्रकरणी कुर्की आदेश देण्यात आला आहे.