बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ निर्माण झाली आहे . सोनालीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या हातातील एन्गजेमेंट रिंग दाखवताना दिसून आली आहे.
सोनाक्षी सिन्हा कुठल्यातरी व्यक्तीसोबत उभी असून अंगठी घातलेल्या हाताने आश्चर्य व्यक्त करताना दिसून आली आहे. 'माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी आणखी वाट बघू शकत नाही.' असे कॅप्शन तिने दिले आहे.
सोनाक्षी सिन्हाने 'विश्वास बसत नाही की हेइतके सोपे होते.'असे फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या पोस्टनंतर ती कदाचित लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिच्या बोटातील अंगठी पाहून तिने एंगेजमेंट केल्याचे समजते. तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचे अभिनंदन केल्या आहेत.