बॉलिवूडमधील पहिली महिला सुपरस्टार, अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी यांची आज अर्थात 13 ऑगस्ट रोजी जयंती आहे. चालबाज, मि. इंडिया, खुदा गवाह, चांदनी , लम्हे, इंरग्लिश विंग्लिश अशा एकाहून एक सरस चित्रपटात त्यांनी दमदार परफॉर्मन्स देऊन स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांचे देशभरातच नव्हे तर जगभरातही लाखो चाहते आहेत. आणि ते आजही या गुणी अभिनेत्रीला खूपच मिस करतात. श्रीदेव यांची प्रोफेशनल लाईफ जशी चर्चेत होती, तितकीच त्यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत होती.
चित्रपट निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी त्यांनी 1996 साली लग्न केलं. श्रीदेवी यांच्याशी जेव्हा भेट झाली तेव्हा बोनी कपूर यांचं मोना यांच्याशी लग्न झालं होतं आणि त्यांना अर्जुन, अंशुला ही दोन मुलंदेखील होती. मात्र तरीही त्यांनी श्रीदेवी यांच्याशी दुसरं लग्न केलं. यामुळे त्यांचा पहिला संसार तर मोडला, पण श्रीदेवी यांनी कधीच त्यांची (सख्खी मुलं) आणि सावत्र मुलांमध्ये भेदभा केला नाही. अर्जुन – अंशुला यांच्यासोबत श्रीदेवी यांचं नातं नेमकं कसं होतं ?, त्या त्यांच्याशी कसं वागायच्या ? याबद्दल बोनी कपूर यांनीच खुलासा केला होता.
अर्जुन-अंशुलावर ठेवायच्या चेक
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी याबद्दल वक्तव्य केलं होतं. श्रीदेवी या चारही मुलांच्या संपर्कात रहायच्या. ‘ आमचं प्राधान्य आमच्या मुलांना आहे, ते आमची प्रायॉरिटी आहेत. ती माझ्यामार्फत अर्जुन आणि अंशुला यांची माहिती घ्यायची, त्यांना चेक करायची. रात्री कितीही उशीर झाला, झोपायला अगदी 3 जरी वाजले तरी ती ( श्रीदेवी) सकाळी 6.30 वाजता उठायची. मुलींनी नाश्ता केला आहे की नाही हे ती आवर्जून चेक करायची. त्या शाळेत जातानाही ती गेटपर्यंत त्यांना सोडायला जायची ‘ अशी आठवण बोनी कपूर यांनी सांगितली.
श्रीदेवी या त्यांच्या कुटुंबासाठी समर्पित होत्या, असं त्यांनी नमूद केलं. 50व्या बर्थडे सेलिब्रेशनबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले की, तेव्हा सर्व मुलं या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होती, आणि हे फक्त तिच्यामुळे (श्रीदेवी) होऊ शकलं. ‘ कुटुंब नेहमी एकत्र असावं, अशी तिची कायमच इच्छा होती. त्यासाठी ती जास्तीचे प्रयत्न देखील करायची’ असंही ते म्हणाले.
लग्नानंतर सोडलं करिअर
श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षीच चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या ‘ कंधन करुणाई’ या चित्रपटात दिसल्या होत्या. 1979 मध्ये ‘सोलवा सावन’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.मात्र लग्न झाल्यानंतर कुटुंबासाठी श्रीदेवी यांनी त्यांचं संपूर्ण करिअर सोडलं होतं. बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर 2012 साली त्यानी पुन्हा धमाकेदार कमबॅक केलं. गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातून त्यांनी धमाल केली. त्यानंतर त्यांनी काम केलेला ‘मॉम’ चित्रपटही खूप गाजला. मात्र 24 फेब्रुवारी, 2018 साली दुबईतील एका हॉटेलमध्ये त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला.