अभिनेता सुनील शेट्टीचा(Sunil shetty) मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty)त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अहान शेट्टी बऱ्याच दिवसांपासून तान्याला डेट करत आहे. आहान आणि तान्या श्रॉफ (Tanya Shroff)दोघेही आधी शाळेत एकत्र शिकायचे.त्यावेळी दोघेही चांगले मित्र होते आणि नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
यानंतर 2015 मध्ये अहान आणि तान्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले. यानंतर दोघेही पहिल्यांदाच अरमान जैनच्या लग्नात कपल म्हणून समोर आले.दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
तान्याच्या वडिलांचे नाव जयदेव श्रॉफ आहे. जयदेव हे UPL लिमिटेडचे ग्लोबल सीईओ आहेत. त्यांची कंपनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत कृषी उत्पादने आणि उपाय पुरवते. जयदेवचे वडील रजनीकांत श्रॉफ 2020 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत 93 व्या क्रमांकावर होते. तान्या स्वतः एक फॅशन डिझायनर आहे. सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या जबरदस्त फॅशनची झलक पाहायला मिळेत .
तान्या अहानला प्रोफेशनली पूर्णपणे सपोर्ट करते. अहानच्या डेब्यू चित्रपट ‘तडप’ च्या शूटिंगदरम्यान ती त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसून आली होती. इतकंच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान तान्याने अहानसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा दिला होता. ती त्यांची सर्वात मोठी चीअरलीडर आहे.
काही दिवसांपूर्वी अहान आणि तान्याच्या लग्नाची बातमी खूप व्हायरल झाली होती. मात्र, अहानने हे वृत्त चुकीचे असल्याचे फेटाळून लावले होते. तो सध्या ज्या रिलेशनशिपमध्ये आहे त्यात तो आनंदी आहे आणि त्याला लग्नाची घाई नाही.