मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही अभिनयाप्रमाणेच तिच्या बेधडक आणि निर्भय वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या मनातील विचार ती स्पष्टपणे मांडते. त्यासाठी तिला जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागले तरी चालते. अभिनेत्रीने फहाद अहमदशी लग्न (marriage) केल्यानंतरही तिला खूप काही ऐकावे लागले. पण स्वराने तिला स्वतःसाठी जे योग्य वाटले तेच केले.
दरम्यान, स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पती फहाद अहमदच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच स्वराने काही फोटोही शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही स्वराच्या लग्नाचे आहेत तर काही फंक्शनदरम्यानचे. जिथे फहादची पहिली पत्नी प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक फंक्शनमध्ये उपस्थित होती. हे वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण फहादची खरी पत्नी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्याचा खास अरिश कमर आहे. ज्याला स्वरा तिची सवत मानते.
खरंतर, स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अरिश कमरसोबतचे काही फोटो शेअर केले आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने पोस्टला खास कॅप्शनही दिली आहे. ‘ आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा मूळ जोडीदार अरिश कमर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ याशिवाय, स्वराने त्याला नेहमीच त्यांच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, तिची सर्व कागदपत्रे वेळेवर सादर केल्याबद्दल, तिचा साक्षीदार असल्याबद्दल आणि तो आत्तापर्यंतची सर्वोत्तम ‘सौतन’ म्हणजे सवत असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.
स्वरा भास्करच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘सर्वोत्तम सवत’. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी फेब्रुवारीमध्ये स्वरा भास्करसोबत विवाह केला होता अभिनेत्रीने ही बातमी तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली होती. स्वराचं लग्न खूप चर्चेत होतं. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मानुसार त्यांनी त्यांच्या लग्नाचे विधी केले.