बुआजींनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला ? उपासना सिंग यांनी सांगितलं कारण; माझ्या पंचलाईन्स..

| Updated on: Jan 03, 2025 | 2:04 PM

अभिनेत्री उपासना सिंग या नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी 'द कपिल शर्मा शो' सोडण्याचं खरं कारण सांगितलं. तो शो सोडल्यावर बराच काळ त्याकुठेही दिसल्याच नव्हत्या.

बुआजींनी द कपिल शर्मा शो का सोडला ? उपासना सिंग यांनी सांगितलं कारण; माझ्या पंचलाईन्स..
उपासना सिंग
Follow us on

भन्नाट कॉमिक टायमिंग आणि पंचलाइन्समुळे प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री उपासना सिंग बऱ्याच काळापासून टीव्ही जगतापासून दूर आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या गायबच आहेत. आजही प्रेक्षक त्यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मिस करतात. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये त्याने एक आयकॉनिक भूमिका साकारली होती. पण आता सध्या त्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यांचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसही उघडले आहे. ज्याद्वारे उपासना यांनी आतापर्यंत इंडस्ट्रीत आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

कपिल शर्मा शो का सोडला ?, उपासना यांनी सांगितलं कारण

उपासना सिंह या नुकत्याच सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टवर आल्या होत्या. तेथे गप्पा मारताना त्यांनी कपिलच्या शोला अलविदा करण्याचे खरे कारण सांगितले. जेव्हा उपासना यांनी कपिलचा शो सोडला तेव्हा त्यांनी स्वतःला टीव्हीच्या जगापासून दूर केले. शोमध्ये घालवलेल्या त्या वेळेबद्दल उपासना भरभरून बोलल्या – जवळपास अडीच वर्ष आमचा शो हा टॉपला होता, पण माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की माझ्याकडे नवं असं करण्यासारखं काहीच नव्हतं. मी कपिलशी देखील याबद्दल बोलले होते.

” आमच्या दोघांचाही बाँड अतिशय चांगला आहे. आमच्यात कधीच कोणताही वाद, किंवा भांडणं झालं नाही, पण लोकांना तसं का वाटलं काही कल्पना नाही. माझा रोल आता काही वेगळा वाटत नाहीये,असं मी कपलिला म्हणाले होते. मी जे काम करत होते, त्यामध्ये मला (काहीच) मजा येत नव्हती. माझ्या भूमिकेकडे थोडं तरी लक्ष द्या, असं मी त्याला बोलले ” असं उपासना सिंग यांनी सांगितलं.

” माझ्या हातातून सगळ्याच गोष्टी निसटत चालल्या होत्या, कारण कॉन्ट्रॅक्टबद्दल चर्चा सुरू होती. चॅनेलमध्येही सगळं काही आलबेल नव्हतं. त्यामुळे गोष्टी आणखीनच कठीण झाल्या,” असं उपासना म्हणाल्या. “माझं कॉन्ट्रॅक्ट रपिलसोबत नव्हत,चॅनेलसोबत होतं. ते लोक जेव्हा दुसऱ्या चॅनेलसोबत गेले, तेव्हा मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाही. टीममध्येही टेन्शन होतं, मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कृष्णा अभिषेकसोबत मी जेव्हा दुसरं चॅनेल जॉईन ला तेव्हा, कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत मला तिथेच थांबावं लागलं” , असं त्यांनी नमूद केलं.

उपासना पुढे म्हाल्या की, : या काळात मी क्रिएटिव्ह टीमसोबत काही गोष्टींचाही सामना केला. ते माझ्या पंचलाईन कापायचे. प्रेक्षक हसतील तिथेच ते माझ्या ओळी काढतील हे मला माहीत होतं. मला टॉर्चर वाटत होतं, अली असगर लाही सेम इश्यू सहन करावा लागला, क्रिएटिव्ह लेव्हलवर आम्ही समाधानी नव्हतो” , असा अनुभव उपासना यांनी सांगितला.

कपिलसोबत कसं होतं बाँडिंग ?

मात्र, कपिल शर्माने नंतर उपासना सिंह यांना शोमध्ये परतण्याची ऑफर दिली, पण तोपर्यंत अभिनेत्रीचे फोकस दुसरीकडे होता. तेव्हा मी दोन पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली होती. त्या चित्रपटांमध्ये कपिलने व्हॉईसओव्हरही दिला होता, असं उपासना यांनी तेव्हा सांगितलं.