नंदमुरी बालकृष्ण यांचा Daaku Maharaaj चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 12 जानेवारीला हा पिक्चर रिलीज झाला, अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने त्याचं निम्म बजेट कव्हर केलंय.हो , हे खरं आहे. 100 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 56 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. पण हा चित्रपट खरंतर ज्या कारणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे त्यातील Dabidi Dabidi गाणं. उर्वशी रौतेल हिच्यासह नंदमुरी बालकृष्ण यांनी केलेला चित्रविचित्र डान्स पाहून चाहते आधीच भडकले होते. आता आणखी एक असा व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून अनेकांनी 64 वर्षांच्या या स्टारला खडेबोल सुनावत त्याची चांगली शाळाच घेतली आहे.
Daaku Maharaaj या चित्रपटाने दोन दिवसांत चांगली कमाई केली असून अर्धे बजेट कव्हर केलं आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या यशाबद्दल खास सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या या पार्टीमध्ये उर्वशी रौतेलानेही हजेरी लावली. याच पार्टीत उर्वशीने नंदमुरी बालकृष्ण याच्यासोबतच डान्स करत होती, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि पाहता पाहता तो बराच व्हायरलही झाला. मात्र त्या व्हिडीओमध्ये, उर्वशी ही डान्स करताना बरीच अनकम्फर्टेबल दिसत होती. काय आहे तो व्हिडीओ, तुम्हीदेखील पहा..
उर्वशी झाली अनकम्फर्टेबल, व्हिडीओ पाहिला का ?
उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘डाकू महाराज’च्या संपूर्ण टीमसोबत एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. त्यानंतर नंदामुरी बालकृष्ण उर्वशी रौतेलासोबत ‘ Dabidi Dabidi’ गाण्यावर नृत्य करतात. यावेळी, नृत्य करताना त्या नटाने हुकस्टेप सुरू करताच, उर्वशी खूपच अनकम्फर्टेबल, खूपच अस्वस्थ दिसली. उर्वशी रौतेला हसून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. नृत्यादरम्यानचे तिचे एक्सप्रेशन पाहून ती ा डान्समुळे खूश नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
मात्र याचदरम्यान मागे उभे असलेले काही लोकही हसत होते. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी बरेच भडकले आहेत. अनेक युजर्सनी उर्वशी आणि सुपरस्टारला खडेबोल सुनावत त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. या व्हिडीओवर असंख्य लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. करिअरसाठी काय काय करावं लागतंय, असं एका युजरने लिहीलं. तर, एवढा मोठा स्टार आहे पण तरीही तरूण मुलीच्या मागे लागलाय असं लिहीत एकाने नंदामुरी बालकृष्ण याच्यावर टीका केली. उर्वशी डावन्स करताना किती अनकम्फर्टेबल आहे, याचाही अनेकांनी कमेट्समध्ये उल्लेख केला आहे. काहींनी त्या नटाला अंकल म्हटलं तर काहींना त्याचा थेट आजोबा असा उल्लेख करत हेटाळणी केली.
उर्वशीकडे कामच नाही !
सध्या उर्वशी रौतेला डाकू महाराज या चित्रपटात दिसली असली तरी बऱ्याच दिवसांपासून ती बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. सोशल मीडिया आणि इव्हेंटमधून ती तिची बहुतांश कमाई करत असते.