बाई आता तरी जिभेला आवर घाल.. जान्हवीने रडत मागितली माफी, विशाखा सुभेदारने सुनावलं..

| Updated on: Aug 22, 2024 | 2:15 PM

‘बिग बॉस मराठी 5’हा शो सध्या खूप गाजत असून नेहमीप्रमाणेच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान घरातील एक सदस्य असलेल्या जान्हवी किल्लेकर हिने पंढरीनाथ कांबळे यांच्याशी वाद घालत त्यांच्या करिअरवरून टिपण्णी केली. 'आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे' असे म्हणत तिने पंढरीनाथ उर्फ पॅडी यांची खिल्ली उडवली. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापलं असून घरातील सदस्यांना तिचं हे बोलणं आवडलं नाही.

बाई आता तरी जिभेला आवर घाल.. जान्हवीने रडत मागितली माफी, विशाखा सुभेदारने सुनावलं..
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’हा शो सध्या खूप गाजत असून नेहमीप्रमाणेच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान घरातील एक सदस्य असलेल्या जान्हवी किल्लेकर हिने पंढरीनाथ कांबळे यांच्याशी वाद घालत त्यांच्या करिअरवरून टिपण्णी केली. ‘आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे’ असे म्हणत तिने पंढरीनाथ उर्फ पॅडी यांची खिल्ली उडवली. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापलं असून घरातील सदस्यांना तिचं हे बोलणं आवडलं नाहीये. त्याचबरोबर हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना तसेच इतर कलाकारांनीही तिचं हे बोलणं बिलकूल रुचलं नाही. यावरून सोशल मीडियावरही वाद रंगला असून पॅडी यांची मुलगी, तसेच सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या वक्तव्याबद्दल जान्हवीला खडेबोल सुनावले आहेत.

हे प्रकरण खूपच तापलं असून आपल्यावर शेकताना दिसल्यावर आता जान्हवीला तिच्या चुकीची उपरती झाली आहे. त्यानंतर तिने बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडून, अश्रू गाळत पॅडी यांची माफी मागितली आहे. मात्र तिची ही माफी, तिचा पश्चाताप खरा नसून केवळ नाटक आहे, असं काही कलाकारांनी म्हटलंय .

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी यापूर्वी पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांना सपोर्ट देणारी पोस्ट लिहीली होती. आता जान्हवीच्या माफीनाम्यानंतरही विशाखा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून जान्हवी हिला पुन्हा खडेबोल सुनावले आहेत. तो खरच बाप माणूस आहे…! असं म्हणत विशाखा यांनी पॅडी यांचं कौतुक केलं आहे.

विशाखा सुभेदार यांची पोस्ट काय ?

माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो… पण मनाचा मोठेपणा मात्र दाखवलायं. Its ok. म्हणजे ठीक आहे असं म्हणालाय..
Actor आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो.. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणतं असेल हे कळुच शकत आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे..! त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे खोटे कळले नसतील? तरीही तुझ्या खोट्या अश्रू नां तो its ok म्हणाला.. कारण तो खरच बाप माणूस आहे…! त्याने दिला असेल विषय सोडुंन पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. More power to Paddy Kamble.
लढ बापू

#aplapaddy #संयमकायम #actor असे हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.

 

अनेक कलाकारांचा पॅडी यांना पाठिंबा

पॅडी यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराबाबात जान्हवीने केलेलं वक्तव्य , तिने उडवलेली खिल्ली अनेकांना रुचली नाही. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी जान्हवीवर टीका केली . पंढरीनाथ यांच्या मुलीने तसेच अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत जान्हवीच्या वक्तव्यावर टीका केली. ‘ खरंतर ‘ओव्हरअॅक्टिंग’ हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे.. स्पर्धकांच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी, खासकरून वर्षा उसगांवकर आणि बाबाच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल.’असं पॅडी यांच्या मुलीने ग्रीष्माने जान्हवीला सुनावलं.

तर ‘ तुझ्यासारखी कितीही (जा) नवी लोकं आली ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव.. जुनं तेच सोनं.. आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणारा आहे’, अशा शब्दांत सिद्धार्थने जान्हवीला सुनावलं होतं.