मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत क्रिती सेनॉनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच आता ती ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं सीतेची भूमिका साकारली आहे. सध्या क्रिती तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसंच या ट्रेलरला खूप पसंती मिळाली आहे. अशातच, एका मुलाखतीमध्ये क्रितीने तिच्या मॉडेलिंगच्या वेळीचा एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
हार्पर बाजार इंडियाला क्रितीने मुलाखत दिली. यावेळी तिनं सांगितलं की, ती तिच्या पहिल्या फोटोशूटवेळी खूप नर्व्हस होती. यादरम्यान तिनं तिच्या आईबद्दलही सांगितलं. तिची आई प्रोफेसर होती, तसंच तिने गरोदर असताना पीएचडी पूर्ण केली होती.
“मला माझ्या पहिल्या फोटोशूट वेळी खूप नर्व्हस वाटत होतं. त्यावेळी माझ्याकडून थोडी चूक झाली होती. त्यामुळे घरी आल्यावर मी रडले होते. कारण मी चांगलं करू शकले नाही याचा मला त्रास झाल्याचं क्रिती सेनॉननं सांगितलं. क्रितीनं सांगितलेला हा किस्सा तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली तेव्हाचा आहे. तसंच तिने पहिला चित्रपट महेश बाबूसोबत केला होता.
प्रत्येकामध्ये आत्मविश्वास हा वेळेसोबत येतो. मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या यशापेक्षा अपयशातून जास्त शिकता. तसंच चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा माझा मंत्र असल्याचंही पुढे क्रिती सेनॉन म्हणाली.