सारा आणि शुबमन गिल यांचेही तसले फोटो व्हायरल, सचिन तेंडुलकर यांची लेक डीपफेकची शिकार

| Updated on: Nov 09, 2023 | 10:37 AM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेटर शुभमन गिलही सारा तेंडुलकरसोबत दिसत आहे. हा फोटो पाहून बराच गोंधळ माजला असून सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

सारा आणि शुबमन गिल यांचेही तसले फोटो व्हायरल, सचिन तेंडुलकर यांची लेक डीपफेकची शिकार
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) सध्या बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याप्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. त्या व्हिडीओत दुसऱ्या मुलीच्या शरीरावर रश्मिकाचा चेहरा लावून तो व्हिडीओ पब्लिश करण्यात आला होता. AI टेक्नोलॉजीचा वापर करुन रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. यावरून मोठा गदारोळ माजला. रश्मिकाने त्याबद्दल पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली. तर बिग बी अमिताभ बच्चनही रश्मिकाच्या बाजूने मैदानात उतरले आणि त्यांनी यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

आता याच डीपफेक टेक्नॉलॉजीचा फटका प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा (sara tendulkar) हिला बसला आहे. सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल (shubaman gill) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते दोघेही एकत्र दिसत आहेत. फोटोसाठी पोझ देताना सारा शुभमन गिलला मिठी मारतेय असा तो फोटो आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि शुबमनच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असून त्याच दरम्यान हा फोटो समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं.

पण खरं सांगायचं तर सारा आणि शुबमनच्या त्या फोटोमध्ये काहीच तथ्य नाहीये. हा ओरिजनल फोटो नसून तो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मॉर्फ करण्यात आला आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचे मॉर्फ केलेले फोटो गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हा फोटो पाहून सर्वजण गोंधळले आणि लोकांना वाटले की सारा आणि शुभमन यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे. पण हे चित्र AI डीप फेकच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. साराचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून घेण्यात आला असून सारासह बसलेली व्यक्ती ही शुबमन नसून तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहे.

भावासोबत साराने शेअर केला होता फोटो

24 सप्टेंबर रोजी साराने तिचा भाऊ अर्जुनसोबतचा हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. अवघ्या एक महिन्यानंतर ते एडिट करून ट्विटरवर व्हायरल करण्यात आले. मूळ फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर खुर्चीवर बसला आहे आणि सारा आपल्या भावाला प्रेमाने मिठी मारत आहे. या फोटोमध्ये अर्जुनच्या चेहऱ्यावर शुभमनचा चेहरा लावण्यात आला आहे.

 

शुबमन आणि सारा यांच्यात अफेअरच्या बातम्या नेहमीच येत असतात. सोशल मीडियावर दोघांची चर्चा असते. सध्या वर्ल्ड कप सुरू असून मुंबईतील एका सान्यासाठी सारा तेंडुलकर हजर होती. टीम इंडियाच्या सामन्यात शुबमन गिल आऊट झाल्यावर  साराची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

रश्मिका मंदानाच्या फोटोनंतर डीपफेक टेक्नोलॉजी बद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न, त्यांच्या प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे असे डीपफेक व्हिडिओ शोधून ते हटवण्यासाठी केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.