मुंबई : झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र, आता या मालिकेचा सिक्वेल अर्थात जुन्या मालिकेऐवजी ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु होणार आहे (Aggabai Sunbai fame Actress Uma Pendharkar is also working as councilor know detail about her).
‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत ‘शुभ्रा’च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा, तर काहींसाठी नवखा वाटणारा ‘उमा पेंढारकर’ हा चेहेरा दिसणार आहे. मुळात एक ‘काऊंसिलर’ असलेल्या उमाचा ‘अग्गबाई सूनबाई’पर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
जेव्हा या वाहिनीकडून या मालिकेची ऑफर आली तेव्हा मलाही असाच प्रश्न पडला होता की, तेजश्री खूप सिनियर आणि मोठी अभिनेत्री आहे. पण, मी या मालिकेत तिची रिप्लेसमेंट म्हणून आलेले नाही. या शुभ्राचं रूप तिच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की, नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत. सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, तर अभिजीत राजेंनी घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हा दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने शुभ्रा घरातच आहे. ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, ही नवी शुभ्रा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास उमाने व्यक्त केला आहे.
डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला. यावेळी तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे पहिलं-वहिलं नाटक मिळालं. याखेरीज उमानं सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काऊंसिलिंगचं कामही मोठया जबाबदारीनं करते (Aggabai Sunbai fame Actress Uma Pendharkar is also working as councilor know detail about her).
या नवीन प्रवासाबद्दल उमाला विचारलं असता ती म्हणते, ‘तसं पाहिलं तर ‘अग्गबाई सासूबाई’चीच संपूर्ण टीम या मालिकेत आहे. केवळ मी आणि अद्वैत दादरकर वगळता इतर बरेचजण तेच आहेत. त्यामुळे त्यांची एक भट्टी जमली आहे. यात आपण सहभागी होऊ शकू का?, असा प्रश्न सुरुवातीला पडला होता, पण पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांनी आपलेपणा दाखवला. त्यामुळे नवखेपण कुठे जाणवलंच नाही. निवेदिता ताई असोत, गिरीश ओक असोत किंवा मोहन जोशी सर, हे सर्वजण इतके मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मज्जा येत आहे. इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव घेत असल्याने मनात एक वेगळाच आनंद आहे.’ ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका येत्या 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
(Aggabai Sunbai fame Actress Uma Pendharkar is also working as councilor know detail about her)
‘शितली’ची काकी झालीय समरची ‘नीलम’, मंजुषाचा ट्रान्स्फरमेशन अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’