अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात खरच दुरावा? लेकीच्या बर्थडे पार्टीत एकत्र असूनही एकमेकांसोबत फोटो नाही; पार्टीतल्या ‘त्या’ व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा

| Updated on: Dec 01, 2024 | 6:54 PM

आराध्या बच्चनच्या 13 व्या वाढदिवसास अभिषेक बच्चन अनुपस्थित असल्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा आराध्याच्या वाढदिवस पार्टीमधले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोघांनी वेगवेगळे व्हिडिओ का शेअर केले याबद्दल नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात खरच दुरावा? लेकीच्या बर्थडे पार्टीत एकत्र असूनही एकमेकांसोबत फोटो नाही; पार्टीतल्या त्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा
Follow us on

 

आराध्याच्या बर्थडेचा व्हिडीओ;अभिषेक-ऐश्वर्याचे लेकीसोबत वेगवेगळे फोटो

ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाबद्दल काहीना काही बातमी सतत येतच असते. काहीच दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चनची लेक आराध्या बच्चन हिचा 13 वा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा वाढदिवसाला अभिषेक बच्चन हजर नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण त्यावर अभिषेकने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता एका व्हिडीओमुळे सर्वांनाच त्याचे उत्तर मिळाले आहे

आराध्या बच्चनच्या वाढदिवसादिवशी ऐश्वर्या आणि तिचे फोटो फक्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा अभिषेक का नाहीये यावरून सर्वांनीच प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता अभिषेक आणि ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ट्रोल करणाऱ्या आणि अभिषेक वाढदिवसादिवशी कुठे होता याचे उत्तर मिळाले आहेत.’

‘त्या’ व्हिडीओमुळे खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता हे सत्य समोर आलं आहे. आराध्याची बर्थडे पार्टी आयोजित करणाऱ्य आयोजकांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने त्या आयोजकांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमुळे अभिषेक आराध्याच्या बर्थडेसाठी हजर होता, हे यावरून लक्षात येत आहे.

मात्र, दोघांनीही वेगवेगळे व्हिडीओ बनवून शेअर केले आहेत.. हे व्हिडीओ आयोजकांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागील 13 वर्षांपासून हे आयोजक आराध्याच्या बर्थडे पार्टीचं आयोजन करत आहेत. असं या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या म्हणताना दिसत आहे.

लेकीच्या बर्थडेला अभिषेक-ऐश्वर्याचा एकत्रित एकही फोटो नाही

अभिषेक आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता हे तर या व्हिडीओमध्ये दिसत आहे त्यामुळे तो लेकीच्या वाढदिवसाला गायब का होता या चर्चांना आता या व्हिडीओमुळे पूर्णविराम मिळाला असला तरी पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की दोघांनी वेगवेगळे व्हिडीओ का बनवले. एकाच ठिकाणी असून वेगवेगळे व्हिडीओ का? असे प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोटाच्या चर्चा आजही तेवढ्याच होत आहेत. मात्र दोघांनी अद्यापही याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं? याबाबत इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही उत्सुकता आहे.