Aishwarya-Abhishek Spotted : बॉलिवूडमधील विख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर 2 मार्च 2025 रोजी लग्नबंधनात अडकला. नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खानपासून ते विद्या बालनपर्यंत अनेक स्टार्स या लग्नात सहभागी झाले होते. मात्र त्या सर्वांपेक्षा दुसरीच एक जोडी सतत चर्चेत होती. नवविवाहीत दांपत्यापेक्षा या जोडीचीच सगळ्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा सुरू होती. गेल्या अनेक महिन्यांपासून घटस्फोटाच्या , वेगळं होण्याच्या अफवा उडत असताना अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे अगदी ट्विनिंग करत आशुतोष गोवारीकरच्या मुलाच्या लग्नासाठी पोहोचले होते.
या लग्नात दोघेही पांढऱ्याशुभ्र ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसले. सौंदर्यवती ऐश्वर्याने यावेळी व्हाईट कलरचा सुंदर ड्रेस घातला होता. त्यासोबतच हातात मॅचिंग पोटली आणि मॅचिंग ज्वेलरीही तिने परिधान केली होती. मोकळे सोडून सेट केलेले केस आणि ट्रेडमार्क रेड लिपस्टीकमध्ये अमेझिंग दिसणाऱ्या ऐश्वर्याकडे प्रत्येकजण कौतुकाने पहात होता.
पत्नीसह अभिषेकचेही ट्विनिंग
तर तिच्यासोबतच आलेला अभिषेक बच्चनही पांढऱ्या शेरवानीमध्ये मस्त दिसत होता. त्याने शेरवानीसोबत काळे फॉर्मल शूज घातले होते. काही व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, हे जोडपं (इस्कॉनच्या) हरिनाम दास यांना भेटताना आणि हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. हरिनाम दास यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या आणि अभिषेकचे हे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या जोडप्याला श्री श्री राधा वृंदावन चंद्रजींचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन चंद्रोदय मंदिरात येण्याचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी कॅप्शनमध्य लिहीले होते.
आशुतोष गोवारीकरांच्या मुलाचं थाटामाटात लग्न
आशुतोष यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. रविवारी (2 मार्च रोजी) मुंबईत कोणार्कने त्याची गर्लफ्रेंड नियती कनकियाशी लग्न केलं. नियती कनकिया ही गुजराती असून ती एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलबर रसेश बाबुभाई कनकिया यांची कन्या आहे. कोणार्क व नियती मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा अगदी हिंदू अन् पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला आहे.