मुंबई | 21 मार्च 2024 : बॉलिवूडमधील नामवंत कुटुंब असलेली बच्चन फॅमिलीतील वादाच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून फिरत आहे. बच्चन कुटुंब आणि सूनबाई ऐश्वर्या राय यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या ही तिची लेक आराध्या हिच्यासह तिच्या आईच्या घरी निघून गेल्याचे वृत्त होते. नुकताच अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता हिचा 50 वा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. मात्र त्या पार्टीसाठी संपूर्ण कुटुंब आलं असलं तरी श्वेताचा भाऊ अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या मात्र पार्टीत कुठेच दिसले नाहीत त्यामुळे त्यांच्यातील बेबनावच्या चर्चांना अजूनच जोर चढला. पण बच्चन कुटुंबापैकी कोणीच यावर अधिकृत भाष्य केले नाही.
जया बच्चन आणि ऐश्वर्या या दोघींमध्येही विस्तव जात नसल्याचे वृत्त काही महिन्यांपासून फिरत आहे. पण यावर ऐश्वर्या राय, अभिषेक किंवा इतर कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता ऐश्वर्या तिच्या सासूबाई, जया बच्चन यांच्यासोबत फारच कमी वेळा स्पॉट होते.
मात्र एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन या त्यांच्या सुनेचे कौतुक करताना थकत नव्हत्या. एकदा तर जया बच्चन यांचं बोलणं ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. अभिषेक -ऐश्वर्या यांचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. तेव्हा एका सोहळ्यात जया बच्चन यांनी नव्या सुनेचं, ऐश्वर्याचं भरभरून कौतुक करत तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं.
इमोशनल झाली ऐश्वर्या राय
हा किस्सा खूप जुना आहे. 2007 साली अभिषेक -ऐश्वर्याने थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं. लग्नानंतर ते फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला गेले होते. त्या सोहळ्यासाठी जया बच्चन तसेच श्वेता बच्चनही उपस्थित होती. या सोहळ्यात भाषण करताना जया बच्चन यांनी त्यांच्या सुनेचं भरभरून कौतुक केलं. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या की त्यांचं भाषण ऐकून ऐश्वर्यादेखील खूप इमोशनल झाली. सासूबाईंच बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले.
काय म्हणाल्या जया बच्चन ?
‘ मी एका सुंदर मुलीची सासू झाले आहे. तिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहेत. मला तिचं हसणं खूपच आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. मी तुला सांगू इच्छितो की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ अशा शब्दात जया बच्चन यांनी ऐश्वर्याचं कौतुक करत तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. सासूबाईंच हे भाषण ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या खूपच भावूक झाली होती.
सर्वांसमोर रडली ऐश्वर्या राय
पुरस्कार सोहळ्यातील हे भाषण ऐकून ऐश्वर्या खूपच इमोशनल झाली. ती तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. आणि तिथे सगळ्यांसमोर ती रडू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा तिचा पती अभिषेक बच्चन तिच्या शेजारीच बसला होता. त्याने ऐश्वर्याला धीर देत तिला सांभाळलं, शांत केलं. हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.