अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्याने रेखाला संपूर्ण जगासमोर आई म्हटलं; याचं कारण अखेर समोर आलं

| Updated on: Dec 04, 2024 | 6:46 PM

एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याने रेखाला "आई" म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ऐश्वर्या रेखाला आई का मानते याचं एक खास कारण आहे.

अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्याने रेखाला संपूर्ण जगासमोर आई म्हटलं; याचं कारण अखेर समोर आलं
Follow us on

ऐश्वर्या रायचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी अगदी घट्ट मैत्रिचे नाते आहे. त्यात आवर्जून नाव येतं ते रेखाचे. कोणत्याही कार्यक्रमात रेखा आणि ऐश्वर्या एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांशी कायम आपुलकीने भेटतात. रेखा देखील ऐश्वर्यावर नेहमी प्रेम आणि माया करताना दिसते. या दोघींचे नाते किती घटट् आहे हे सर्वांनाच माहित आहे.

अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याने रेखाला आई म्हटलं 

ऐश्वर्या आणि रेखाचे नाते इकते घट्ट आहे की ऐश्वर्या रेखाला आई म्हणते. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याने रेखाला तिची आई म्हटलं होतं. त्यामुळे नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ऐश्वर्या आणि रेखाचे एकमेकांशी खूप चांगले नाते आहे, त्यांच्यात एक खास बॉन्ड आहे. ऐश्वर्याने रेखाला आई म्हणण्यामागे एक खास कारण आहे. आणि जेव्हाही दोघीही कधी भेटतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्या खऱ्या आई आणि मुलीसारखेच वागताना दिसतात.

एका जुन्या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्याने रेखाला संपूर्ण जगासमोर आई म्हटले होते. ऐश्वर्याने रेखाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला होता. यावेळी ऐश्वर्याने ‘आई’च्या हातून पुरस्कार स्वीकारणे हा सन्मान असल्याचं म्हटले होतं. हे पाहून इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती.

ऐश्वर्या आणि रेखा खास सुंदर नाते 

ऐश्वर्या आणि रेखा यांच्या सुंदर नात्याचे कारण संस्कृती आहे. या दोघीही दक्षिण भारतीय आहेत. दक्षिण भारतात आपल्यापेक्षा मोठ्या महिलांना आदराने आई म्हटलं जातं आणि आईसारखाच आदर दिला जातो. या संस्कृतीमुळेच ऐश्वर्या रेखाला आई म्हणते. शिवाय तिच्या मनातही रेखाबद्दल आईचीच भावना असल्याचे तिने नेहमी सांगितले आहे.

तसेच तसेच रेखा यांनी एकदा ऐश्वर्याला इमोशनल पत्र लिहिले होते. खरेतर रेखा यांनी ऐश्वर्याच्या नावाने एका मासिकात भावनिक पत्र लिहित आपले प्रेम व्यक्त केले होते. त्यांनी या पत्राच्या सुरूवातीला “मेरी ऐश” असे लिहिले होते आणि पत्राच्या शेवटी ‘रेखा माँ’ असे लिहिले होते.

आजही अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याची चर्चा 

आजही लोक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल बोलतात. आजही त्यांची प्रेमकहाणी ताजी असल्यासारखीच आहे. अशा परिस्थितीत ऐश्वर्याने रेखाला आई म्हणणे म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखेच होते. पण त्यावर बच्चन कुटुंबियांकडून किंवा रेखाकडूनही काही प्रतिक्रिया कधी दिली गेली नाही.

सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा होतानाच दिसत आहेत. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यावर देखील अद्यापही अभिषेक आणि ऐश्वर्याने कोणती माहिती किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.