प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. मात्र याच दरम्यान, पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायने तिच्या खास शैलीत रॅम्पवॉक केला आणि हातात लग्नाची अंगठी पुन्हा घालून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. मात्र बच्चन कुटुंबातील कोणीतरी विभक्त होण्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा असे रिपोर्ट्स आले होते की अमिताभ यांची लेक श्वेता बच्चन ही तिचा पती निखिल नंदा यांच्यापासू विभक्त होणार आहे. दोघंही वेगवेगळे राहतात, तर त्यांची मुल नव्या आणि अगस्त्य हे दोघे श्वेतासोबत राहतात. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आका सोशल मीडियावर नेटीझन्सनी श्वेता बच्चन नंदा हिला हृतिक रोशनच्या नावाने ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
खरंतर अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन हे बालपणीचे मित्र आहेत. हृतिकची श्वेता नंदासोबतही चांगली मैत्री आहे. 2014 साली हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान हे दोघे वेगळे झाले. आधी दोघांचाही आनंदाने संसार सुरू होता. मात्र नंतर ते विभक्त झाले. सुझानपासून वेगळं झाल्यावर, लग्न मोडल्यावर हृतिकची त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी, श्वेताशी जवळीक वाढली,असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला.
हृतिक श्वेताची जवळीक कशी वाढली ?
हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली तेव्हा अभिषेक बच्चन अनेकदा त्याला भेटायला यायचा. तेव्हा श्वेताही त्याच्यासोबत असायची असा दावा अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला. तेव्हा त्यांनी बराच वेळ एकत्र घालवला. पण त्यांची मैत्री संपल्यानंतर कुणाल कपूरचे लग्न झाल्यावर ते एकत्र आले. अनेक पार्टी आणि लग्नसोहळ्यांमध्ये ते एकत्र स्पॉट झाले होते.
याच काळात श्वेता नंदा यांनी मुंबईत स्टायलिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांची दोन मुले अगस्त्य आणि नव्या नवेली हे बोर्डिंगला गेले होते. लग्नानंतर लगेचच श्वेता नंदा दिल्ली सोडून मुंबईत होती. श्वेता नंदा आपल्या पतीपासून विभक्त झाल्याचाही अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला. पण कुटुंबामुळे तिने घटस्फोटासाठी अर्ज केला नाही.
नातं का टिकलं नाही ?
श्वेता बच्चन आणि हृतिक रोशनच्या डेटींगच्या अफवेमुळे बराच ड्रामा झाला. रिपोर्ट्सनुसार, श्वेतामुळे हृतिक रोशन आणि कंगना राणौत हे दोघेही दुरावले होते. पण यात किती तथ्य आहे हे फक्त ते जोडपचं सांगू शकेल. खरंतर श्वेता बच्चन आणि सुझान खान याही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. मात्र, हृतिक आणि श्वेता यांच्या जवळीकांमुळे सुझानला खानला नेहमीच अडचण वाटत होती.